मुंबई : फेब्रुवारी महिन्यातील आज शेवटचा सोमवार आहे. आजच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तर तूळ राशीच्या व्यक्ती प्रेम संबंधांमध्ये यशस्वी होणार आहे. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य
या सोमवारी तुम्हाला सरकारकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या फायदा होऊ शकतो. जर तुम्ही संधीचा योग्य पद्धतीने पुरेपुर वापर केला तर व्यावसायिक जीवनामध्ये भविष्यात त्याचा भरपूर फायदा होऊ शकतो.
सोमवारी राजकारण किंवा सामाजिक कार्याशी संबंधित लोकं अनेक सभांमध्ये सहभागी होतील. या सोमवारी तुम्हाला सन्मान मिळेल आणि काही नवीन जबाबदारीही मिळू शकते. गुंतागुंतीचे प्रश्न सोडविण्यात सक्षम असाल.
या सोमवारी तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ शक्य आहे. नातेवाईक आणि मित्रांशी तुमचे संबंध सुधारतील.
निष्फळ कामांमध्ये तुमचा वेळ आणि उर्जा वाया घालवू नका. तसंच तुम्ही घेत असलेल्या तुमच्या निर्णयांकडे योग्य लक्ष द्या. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचं घेणं फायद्याचं ठरेल.
घरात भावंडांच्या वादामुळे अस्थिरता येऊ शकते. तुमच्या प्रेमसंबंधात कोणतीही समस्या येणार नाही. तुमच्या मेहनतीने तुम्ही वरिष्ठांना खूश करू शकता. तुम्हाला आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे.
या सोमवारी तुमच्याकडे नव्या संधी येतील आणि त्यांचा फायदा मिळवण्यासाठी वापर करून घ्या. कौटुंबिक जीवनात अडथळे येऊ शकतात. मालमत्तेवरून वाद यामुळे तुम्ही सतत तणावात राहाल.
नवीन व्यावसायिक संबंध आणि सौद्यांना अंतिम रूप देण्यासाठी हा योग्य कालावधी आहे. प्रेमप्रकरणात तुम्ही भाग्यवान असाल. विवाहित लोकांच्या आवेगामुळे साथीदारासोबत मतभेद होऊ शकतात.
तुम्ही नवीन असोसिएशन किंवा भागीदारीत प्रवेश करू शकता. तुम्ही व्यवसायाच्या प्रकल्पांमध्ये उत्साही आणि विश्वासू आहात, म्हणून तुम्ही भविष्यात पूर्ण यश मिळवू शकता. प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळण्याची चिन्हे आहेत.
तुमच्या साथीदराची साथ तुम्हाला योग्य पद्धतीन मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणार नाही. ही परिस्थिती तुम्हाला गोंधळात टाकेल. अशा वेळी कितीही जवळच्या व्यक्तीला आपली कमतरता सांगू नका.
या सोमवारी व्यवसायाच्या दृष्टीकोनातून तुमची प्रगती होईल. ऑपिसमध्ये ठिकाणी तुम्ही तुमच्या कामाची प्रशंसा करू शकता. स्थिर उत्पन्न तुम्हाला चांगल्या स्थितीसाठी योग्य असेल.
सोमवारी तुम्हाला व्यवसाय क्षेत्रात खूप चांगले परिणाम मिळतील. तसंच, प्रभावशाली लोकांशी असलेले तुमचे संपर्क फायदेशीर ठरतील. व्यवसायिकांना भागीदारीतून चांगला नफा मिळू शकतो. या सोमवारी तुमचा आत्मविश्वास वाढू शकेल.
तुम्हाला तुमचे वरिष्ठ दुर्लक्षित करू शकतात. यासाठी तुम्हाला सामोरं जावं लागेल. तुमचे सहकारी तुमच्या कमकुवतपणाचं भांडवल करून खेळ खराब करण्याचं काम करतील.