आजचे राशीभविष्य | शनिवार | १ जून २०१९

तुमचे भविष्य जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

Updated: Jun 1, 2019, 08:53 AM IST
आजचे राशीभविष्य | शनिवार | १ जून २०१९ title=

मेष- कामात अडथळे आल्याने अधिक मेहनत करावी लागेल. कोणताही निर्णय किंवा कामात घाई करू नका. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता. 

वृषभ- नोकरी आणि व्यवसायाच्यादृष्टीने शुभ दिवस. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. कार्यपद्धतीमध्ये काही बदल होतील. मात्र, हे बदल फायदेशीर ठरतील.

मिथुन- तुमच्या राशीसाठी आजचे ग्रहमान उत्तम. ऑफिसमध्ये एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते. प्रलंबित कामे मार्गी लागतील. जोडीदाराची मदत होईल. 

कर्क- आज ऑफिसमध्ये आपल्या कामाची छाप पाडाल. चांगल्या कमाईसाठी नोकरी बदलण्याचा विचार कराल. त्यादृष्टीने पावले टाकायला आजचा दिवस चांगला. जुनी येणी वसूल होतील. 

सिंह- नोकरी आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळणार नाही. व्यवसायात एखाद्या जाणकाराचा सल्ला घ्या. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. 

कन्या- नोकरी किंवा व्यवसायात मोठे निर्णय घ्यावे लागू शकतात. आर्थिक आवक वाढेल. जोडीदाराकडून एखादी भेट मिळू शकते. 

तूळ- प्रलंबित कामे मार्गी लागतील. नोकरी किंवा व्यवसायात विरोधाचा सामना करावा लागू शकतो. आगामी काळात एखादे मोठे काम करण्याची योजना आखाल.

वृश्चिक- व्यवसायात फायदा होण्याची शक्यता. जुनी कामे मार्गी लागतील. तुमच्यावर सोपवण्यात आलेली एखादी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडाल. 

धनु- नोकरी आणि व्यवसायात अडथळे येण्याची शक्यात. कामकाजासाठी बाहेरगावी प्रवास करावा लागू शकतो. प्रेमप्रकरणाला नवे वळण मिळू शकते. 

मकर- बऱ्याच काळापासून सतावत असलेली चिंता दूर होईल. तुमचा उत्साह वाढेल. मात्र, कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. 

कुंभ- नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. वरिष्ठांकडून एखादा बहुमोल सल्ला मिळेल. जमीनजुमल्याच्या व्यवहारासाठी चांगला दिवस.

मीन- अचानक धनलाभ संभवतो. कर्ज फिटेल. आर्थिक आवक वाढवण्याचे नवे मार्ग दृष्टीपथात येतील. मात्र, इतरांशी बोलताना सावधानता बाळगा. तब्येत बिघडण्याची शक्यता.