Monthly Horoscope| 4 राशींसाठी जुलै महिना खास, तर 'या' राशीच्या व्यक्तींना येणार अडचणी

आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये अडचणींची चाहूल लागली तर त्यासाठी मानसिक तयारी करणं किंवा त्या अडचणी टाळणं शक्य असेल तर तशी तयारी करता येते.

Updated: Jul 1, 2021, 05:27 PM IST
Monthly Horoscope| 4 राशींसाठी जुलै महिना खास, तर 'या' राशीच्या व्यक्तींना येणार अडचणी title=

मुंबई: प्रत्येकाचं महिन्यानुसार नियोजन पहिल्याचं दिवशी ठरलेलं असतं. पण अनेकदा अडचणी सांगून येत नाहीत. आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये अडचणींची चाहूल लागली तर त्यासाठी मानसिक तयारी करणं किंवा त्या अडचणी टाळणं शक्य असेल तर तशी तयारी करता येते. त्यासाठीच जाणून घ्या संपूर्ण महिना 12 राशींसाठी कसा असणार आहे. कृषी पासून व्यवसायापर्यंत आणि लग्नाचे योग ते कौटुंबिक गोष्टींपर्यंत तुम्हाला कोणती काळजी घ्यावी लागणार जाणून घ्या. 

मेष- या राशीच्या व्यक्तींना राजकारणात मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. कृषी क्षेत्रातही मोठा फायदा होईल. नोकरीमध्ये चांगला मार्ग मिळेल. मात्र अडचणी येतील त्यावर मात करत प्रगती हळूहळू होत राहील. मानसिक तणाव असेल. पत्नीची तब्येत अचानक बिघडण्याची शक्यता आहे. नातेवाईकांकडून अचानक भल्याच्या गोष्टी घडतील.   

वृषभ- गणेशजी यांच्या मते वृभष राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. घरात गुडन्यूज मिऴेल. कृषी क्षेत्रातही लाभ मिळेल. व्यापारात मात्र परिस्थिती ठिकठाक राहणार आहे. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत मिळेल. वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा होईल. मानसिक तणाव मात्र या महिन्यात आपल्याला असणार आहे.

मिथुन-  या राशीच्या व्यक्तींना हा महिना चतुराईनं घालवावा लागणार आहे. आपल्या कार्यसिद्धीमध्ये आपण यशस्वी व्हाल. तुम्ही रागावर नियंत्रण ठेवणं योग्य आहे तो तुमच्यावर हावी झाला तर मोठं नुकसान होऊ शकतं. रुग्णालयात जाण्याची वेळ येऊ शकते. कामाच्या ठिकाणी आपल्याला फायदा होण्याची शक्यता आहे. 

कर्क- या राशीच्या व्यक्तींना प्रवासाचा योग आहे. या महिन्यात आपलं भरपूर मनोरंजन होणार आहे. आत्मचिंतन करण्याची संधी मिळाली आहे. कुटुंबातील परिस्थिती बेताची राहिल. मन उदास राहणार आहे. 

सिंह- हा महिना कोर्ट कचेरीच्या कामात जाईल. व्यवसायात चांगली प्रगती होणार. कृषी क्षेत्रात सामन्य परिस्थिती असेल. आईच्या प्रकृतीत सुधारणा होईल. आर्थिक आणि मानसिक कुटुंबीय आणि नातेवाईकांचं सहकार्य मिळेल.
  
कन्या- आर्थिकदृष्ट्या हा महिना खूप अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळे वेळीच नियोजन करा. व्यवसायात अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. कृषी क्षेत्रात सामन्य स्वरुप राहिल. नोकरीमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. अनोळखी व्यक्तींसोबत नवीन कार्य, व्यवहार करणं टाळा

तुळ- हा महिना आर्थिक प्रगती करणार असणार आहे. व्यवसायात चांगली प्रगती होईल. कृषी क्षेत्रात चढ-उतार येतील. नोकरी आणि अधिकार या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागेल. संयम राखणं महत्त्वाचं आहे. जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी होतील. सासरहून मदत मिळेल. आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.

वृश्चिक- जुलै महिना हा कौटुंबिक सुख देणारा असणार आहे. कृषी क्षेत्रात स्थिती मध्यम स्वरुपाची असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. आरोग्य सुधारेल. मित्रांसोबत भेटीगाठी होतील. मित्रांकडून संकटसमयी मदत मिळेल. 

धनु- हा महिना पती-पत्नीचं नातं आणि त्यांची प्रगती करणारा असणार आहे. व्यवसायात चढ-उतार येणार आहेत. कृषी क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. नोकरीत अडचणींचा सामना करावा लागेल. राजकारणात असलेल्यांना फायदा होईल.     

मकर- हा महिना आपल्यासाठी आर्थिक लाभ मिळवून देणार आहे. व्यापार-कृषी क्षेत्रात फायदा मिळेल. नोकरीमध्ये अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

कुंभ- नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळणार आहे. आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे वेळीच नियोजन करणं गरजेचं आहे. पत्नीची साथ मिळेल आणि समस्येचा सामना करण्याचं बळ येईल. 

मीन- हा महिना आपल्यासाठी परिवर्तन करणारा असणार आहे. नोकरीमध्ये प्रगती होणार आहे. कृषी क्षेत्रामध्ये मध्यम स्वरुपाची स्थिती असेल. आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या.