राशीभविष्य | 'या' राशीच्या व्यक्तींना होऊ शकतो अचानक धनलाभ

असा असेल तुमचा आजचा दिवस 

Updated: Oct 29, 2020, 07:23 AM IST
राशीभविष्य | 'या' राशीच्या व्यक्तींना होऊ शकतो अचानक धनलाभ

मेष- धनलाभ होण्याची शक्यता आहे. विरोधकांवर विजय मिळवाल. ऑफीसमध्ये जास्त काम करावे लागेल. वायफळ खर्च कमी करा. सावधान राहा. कोणाच्या सांगण्यावर लक्ष देवू नका. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. पैश्यांच्या संबंधीत कोणावर डोळे बंद करून विश्वास ठेवू नका.

वृषभ- तुमच्या बोलण्याचा प्रभाव इतरांवर होईल. लोक तुम्ही बोललेलं ऐकतील. करिअरवर संपूर्ण लक्ष केंद्रित कराल. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल. मित्रांशी भेटीगाठी होतील. एखादी शुभवार्ता कानावर पडेल. 

मिथुन- पैशांच्या स्थितीत सुधार होऊ शकतो. अचानक धनलाभ होऊ शकतो. रखडलेले पैसे मिळतील. पैशांच्या समस्या सुटतील. कामासंबंधी चांगल्या कल्पना येतील. व्यवहारकुशलता आणि सहनशक्तीने काम कराल तर अनेक काम स्वत:हून मार्गी लागतील. 

कर्क- नोकरी, करियर, पैशांसंबंधी दिवस चागंला आहे. नवीन नोकरी किंवा बढतीच्या प्रयत्नांत असाल तर यश मिळेल. उत्साही राहाल. नवीन लोकांशी ओळखी होतील. अनेक लोक तुमच्या मतांशी सहमत असतील. मित्रांशी घाटीभेटी होतील. 

सिंह- कामात यश मिळेल. फायद्याचे करार होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसुद्धा धन लाभ होण्याची शक्यता आहे. कामात अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. जे हवं आहे ते मिळाल्याने प्रसन्न व्हाल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. चांगली बातमी कानावर येईल.

कन्या- नोकरीत बढतीचे योग आहेत. विचार करून गुंतवणूक करा. कामात कितीही व्यस्त असलात तरी कुटुंबाला वेळ द्याल. काही महत्वपूर्ण कामांमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. पैसे कमावण्यासाठी नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. 
 
तुळ- तुमची काम थांबणार नाहीत. व्यापार आणि नोकरीत अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांसह चांगले संबंध प्रस्थापीत होतील. चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल.

वृश्चिक- महत्वाच्या लोकांशी तुमचा चांगला ताळमेळ राहील. मनात नवे विचार येण्याची शक्यता आहे. विश्वासू लोकांकडून मदत आणि सल्ले मिळण्याची शक्यता आहे. स्वत: प्रतिमा सिद्ध करून दाखलाव. नवीन गोष्ट शिकण्याकडे कल आहे. 

धनू- घरचे वातावरण आनंदाचे राहील. रोजच्या कामांमध्ये तुमचे मन लागणार नाही. छोट्या-छोट्या गोष्टींमुळे राग येईल. कोण्त्याही कामात घाई करू नका. मूड खराब होऊ शकतो. आरोग्य सांभाळा साथीच्या रोगांचा धोका आहे.

मकर- व्यापारात अडकलेला पैसा मिळण्याचे योग आहे. सावधानानी गुंतवणूक करा. आर्थिक नुकसान झाल्याने दुखी होईल. कामाच्या ठिकाणी जास्त काम केल्याने हैराण होऊ शकता.

कुंभ- धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक संकटं दूर होतील. नवीन संधी मिळेल. अचानक धनलाभ होईल. आपत्यांकडून सूख मिळेल. आत्मविश्वास वाढेल. 

मीन- आयुष्यात कोणता तरी मोठा बदल होऊ शकतो. मेहनत केल्याने त्याचे फळ नक्की मिळेल. विचार केलेले कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. खास व्यक्तीसह मनातील गोष्ट शेअर कराल. मोठे निर्णय देखील घ्याल.