Navratri 2024 : घटस्थापनेसाठी फक्त एवढाच वेळ शुभ मुहूर्त! पहिली माळ कोणती? पूजा विधीपासून रंगापर्यंत A-Z माहिती जाणून घ्या

Ghatasthapana : 3 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सावाला सुरुवात होणार आहे. तर पहिली माळपासून रंगापर्यंत, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण माहिती. 

नेहा चौधरी | Updated: Oct 2, 2024, 03:04 PM IST
Navratri 2024 : घटस्थापनेसाठी फक्त एवढाच वेळ शुभ मुहूर्त! पहिली माळ कोणती? पूजा विधीपासून रंगापर्यंत A-Z माहिती जाणून घ्या  title=
navratri 2024 sharadiya navratri 9 colors ghatasthapna muhurta puja significance in marathi

Ghatasthapana Wheat Plantation Significance In Marathi : अश्विनी शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीनुसार नवरात्रोत्सावाला सुरुवात होते. गुरुवारपासून (3 ऑक्टोबर) पुढील 9 दिवस देवाची आराधना करण्यात येणार आहे. देशभरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रात घरोघरी घटस्थापना करण्यात येते. शिवाय घरात अखंड दीप लावण्यात येतो. नवरात्रामध्ये दुर्गा मातेच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. त्यामुळे घटस्थापनेचा मुहूर्त, पूजा विधी, पहिली माळ आणि नऊ रंगांबद्दल जाणून घ्या.  (navratri 2024 sharadiya navratri 9 colors ghatasthapna muhurta puja significance in marathi)

शारदीय नवरात्रीचा शुभ मुहूर्त (Navratri 2024 Shubh Muhurta)

यंदा अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षातील प्रतिपदा तिथी 3 ऑक्टोबरला दुपारी 12.18 मिनिटांपासून शुक्रवारी 4 ऑक्टोबरला पहाटे 2.58 मिनिटांपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 3 ऑक्टोबरला घटस्थापना करायची आहे. नवरात्रीचा हा उत्साह 12 ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजेच दसरा (Dasara 2024 Date) हा सण साजरा करण्यात येणार आहे. 

घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त 

हिंदू पंचागानुसार घटस्थापनेचा शुभ मुहूर्त 3 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजून 15 मिनिटांपर्यंत ते 8 वाजून 22 मिनिटांपर्यंत असणार आहे.

 

हेसुद्धा वाचा - Shardiya Navratri 2024 : नवरात्रीत पहिल्यांदाच अखंड ज्योत लावणार आहात? मग 'या' चुका टाळा, अन्यथा...

 

कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करावी?

3 ऑक्टोबर 2024 - घटस्थापना , शैलीपुत्र पूजा

4 ऑक्टोबर 2024 - ब्रम्हचारिणी पूजा

5 ऑक्टोबर 2024 - चंद्रघंटा पूजा

6 ऑक्टोबर 2024 - कुष्मांडा पूजा

7 ऑक्टोबर 2024 - स्कंदामाता पूजा

8 ऑक्टोबर 2024 - कात्यायनी पूजा

9 ऑक्टोबर 2024 - कालरात्री पूजा

10 ऑक्टोबर 2024 - सिद्धिदात्री पूजा

11 ऑक्टोबर 2024 - महागौरी पूजा

12 ऑक्टोबर 2024 -विजयादशमी पूजा

 

हेसुद्धा वाचा - Shardiya Navratri 2024 : यंदा शारदीय नवरात्रीमध्ये देवीचं वाहन अशुभ; हे संकेत धोकादायक, जाणून घ्या काय सांगतात ज्योतिषचार्य

 

घटस्थापना पूजा विधी (Ghatasthapana 2024 Puja Vidhi)

1. सर्वप्रथम मातीचे भांडे घ्या. त्यात तीन थरांमध्ये माती घाला आणि 9 प्रकारचे धान्य मातीत टाका आणि त्यात थोडं पाणी घाला.
2. आता एक कलश घ्या. त्यावर स्वस्तिक बनवा. मग मौली किंवा कलावा बांधून ठेवा. यानंतर कलश गंगाजल आणि स्वच्छ पाण्याने भरा.
3. त्यात एक पूर्ण सुपारी, फुलं आणि दुर्वा घाला. तसंच अत्तर, पंचरत्न आणि नाणे देखील टाका.
4. कलशाच्या आत आंब्याची पानं लावा. कलशच्या झाकणावर तांदूळ ठेवा.
5. देवीचं स्मरण करताना कलशाचं झाकण लावा. आता एक नारळ घ्या आणि त्यावर कलवा बांधा. कलशवर स्वस्तिक चिन्ह बनवा.
6. कुंकवाने नारळावर टिळक लावा आणि नारळ कलशावर ठेवा.
7. कलशावर नारळासोबत तुम्ही काही फुलेही ठेवू शकता.
8. दुर्गा देवीच्या स्वागतासाठी हा कलश मंदिरात स्थापन करा.
9. दिवा लावा आणि त्याची पूजा करा. 
10. पहिल्या दिवशी विडाच्या पानाची माळ अर्पण करतात. 

नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा आहे.

पहिली माळ
विडाच्या पानाची माळ असते.
 
दुसरी माळ
अनंत, मोगरा, चमेली, किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ.
 
तिसरी माळ
निळी फुले, गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळ फुलांच्या माळ.

चौथी माळ
केशरी अथवा भगवी फुले. अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले.
 
पाचवी माळ
बेल किंवा कुंकवाची वाहतात.
 
सहावी माळ
कर्दळीच्या फुलांची माळ.
 
सातवी माळ
झेंडू किंवा नारिंगीची फुले.
 
आठवी माळ
तांबडी फुले, कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ.
 
नववी माळ
कुंकुमार्चन करतात

 नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी कोणता रंग?

3 ऑक्टोबर 2024 - नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते. आईला पिवळा रंग आवडतो, म्हणून या दिवशी तुम्ही या रंगाचे कपडे घालू शकता.

4 ऑक्टोबर 2024 - नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते. आईचा आवडता रंग हिरवा आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही हिरवे कपडे परिधान करू शकता.

5 ऑक्टोबर 2024 - नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते. आई चंद्रघंटाचा आवडता रंग तपकिरी आहे. आईचा आशीर्वाद घेण्यासाठी या रंगाचे कपडे घालावेत.

6 ऑक्टोबर 2024 - नवरात्रीच्या चौथ्या दिवशी केशरी रंगाचे कपडे घाला. या दिवशी कुष्मांडा मातेची पूजा केली जाते. या दिवशी केशरी रंगाचे कपडे परिधान करावेत.

7 ऑक्टोबर 2024 - नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. आई स्कंदमातेचा आवडता रंग पांढरा आहे आणि तो तिचा आवडता रंग आहे, म्हणून या दिवशी पांढरे कपडे घालावेत.

8 ऑक्टोबर 2024 - नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी मातेची पूजा केली जाते कारण या दिवशी तुम्ही लाल रंगाचे कपडे घाला.

9 ऑक्टोबर 2024 - नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री मातेची पूजा केली जाते. कालरात्री मातेला निळा रंग आवडतो. या रंगाचे कपडे घालावेत.

10 ऑक्टोबर 2024 - नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. आई गौरीला गुलाबी रंग आवडतो. या दिवशी गुलाबी रंगाचे कपडे घालणे शुभ असते.

11 ऑक्टोबर 2024 - नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धिदात्री मातेची पूजा केली जाते. आईचा आवडता रंग जांभळा आहे. या दिवशी जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करावी.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)