मेष- आज तुम्हाला स्वत:ची खरी किंमत कळेल. मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल. नव्या व्यक्तींशी ऑनलाईन गप्पा झाल्यामुळे उत्साह वाढेल. राजकारणातील व्यक्तींना एखादे मोठे पद मिळण्याची शक्यता. दिवस चांगला आहे. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ- मानसिक चढउतार अनुभवायला मिळतील. मात्र, कोणत्याही गोष्टीची फार चिंता करू नका. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले एखादे प्रकरण मार्गी लागेल. नोकरीच्या ठिकाणी वातावरण योग्य असणार आहे. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन- अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता. लोकांच्या मनात काय सुरु आहे, याचा अंदाज येईल. वैयक्तिक आणि कौंटुबिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवाल. दिवस चांगला होती. मोठ्या पदावरील लोकांसोबत भेट होवू शकते. या भेटींचा फायदा तुम्हाला येत्या काही दिवसांत नक्की होईल.
कर्क- अचानक धनलाभ झाल्याने मोठा फायदा होईल. अनेक प्रलंबित कामे मार्गी लागतील. आज घेतलेला एखादा निर्णय भविष्यकाळात फायदेशीर ठरू शकतो. आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस चांगला आहे.
सिंह- एखाद्या व्यक्तीशी संबंध सुधारतील. आत्मविश्वासाने काम करा, पण हट्टीपणा दाखवू नका. एखादी गुंतवणूक चांगला फायदा मिळवून देईल. नोकरीच्या ठिकाणी अलर्ट राहा. कुटुंबाचा देखील विचार करा. सर्व अडचणींमधून मार्ग निघेल. कोणत्याही गोष्टीचा अधिक विचार करून दिवस वाईट करू नका.
कन्या- नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास होऊ शकतो. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. आर्थिक आवक वाढण्याची शक्यता. पुस्तकं वाचाल. बऱ्याच दिवसांनी आत्मचिंतन करण्याचा योग येईल. काही काळ संयम ठेवा, सर्व काही मार्गी लागणार आहे. प्रवासाचा बेत आखाल. आरोग्याची काळजी घ्या.
तूळ- एखाद्या कामात पुढाकार घेतल्यास फायदा होईल. कामाचा व्याप वाढेल, मेहनत करावी लागेल. मात्र, एखादी नवीन गोष्ट शिकायला मिळेल. त्यामुळे भविष्यात फायदा होईल. वायफळ खर्च करू नका.
वृश्चिक- तुमच्या राशीसाठी आज चंद्राची स्थिती अनुकूल आहे. त्यामुळे नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. एखादी चांगली बातमी कानावर पडेल. नवीन प्रेमसंबंधांना सुरुवात होऊ शकते.
धनु- कुटुंबियांच्या सहकार्यामुळे काही कामे मार्गी लागतील. नोकरी आणि व्यवसायातील तणाव दूर होण्याची शक्यता. आर्थिक आवक वाढेल. प्रगतीचे नवे मार्ग दृष्टीपथात येतील.
मकर- आजचा दिवस खूप बिझी असेल. इतरांसमोर स्वत:ची बाजू स्पष्टपणे मांडा. ऑफिसमध्ये कामाची तपासणी होऊ शकते. परिस्थिती तुमच्यासाठी अनुकुल ठरेल. कोणत्याही गोष्टीचा अधिक विचार करून दिवस वाईट करू नका.
कुंभ- नोकरीत एखादा सन्मान मिळेल. जोडीदाराकडून चांगले सहकार्य लाभेल. जमीनजुमल्याचे व्यवहार करणाऱ्यांना यश मिळेल. जबाबदारी घ्यावी लागेल.
मीन- आज तुम्ही एखादे काम कोणत्याही परिस्थितीत पार पाडालच. कोर्टकचेरीचे एखादे प्रकरण उद्भवण्याची शक्यता. नातेवाईकांकडून फायदा होण्याची शक्यता. नोकरीच्या ठिकाणी इतरांवर प्रभाव पाडाल.