Kendra Trikon 2023 : तूळ संक्रांतीला मोठ्या ग्रहांची अशुभ केंद्र त्रिकोण स्थिती! येत्या 30 दिवसात मोठा धोका

Kendra Trikon 2023 : तूळ संक्रांत म्हणजे सूर्य गोचर तूळ राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत सूर्याचे मध्यभागी गुरु, मंगळ, राहू आणि केतू हे प्रमुख ग्रह असणार आहे. त्यात शनिच्या त्रिकोणात येणं हा अशुभ स्थिती निर्माण होते आहे. या योगामुळे जगभरात मोठ्या घटनेचा धोका असल्याचं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ म्हणतात. 

नेहा चौधरी | Updated: Oct 17, 2023, 01:30 PM IST
 Kendra Trikon 2023 : तूळ संक्रांतीला मोठ्या ग्रहांची अशुभ केंद्र त्रिकोण स्थिती! येत्या 30 दिवसात मोठा धोका title=
Kendra Trikon position of major planets in Libra solstice or tula sankranti Big threat in next 30 days astrological predictions

Tula Sankranti /Kendra Trikon 2023 : दर महिन्याला सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सध्या सूर्यदेव कन्या राशीत आहे. येत्या 18 ऑक्टोबरला म्हणजे तूळ संक्रांतीला सूर्य आणि चंद्रासह प्रमुख ग्रह शनि, गुरू, मंगळ, राहू आणि केतू यांची परस्पर स्थिती असणार आहे. सूर्य कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. या स्थितीत पुढील 30 दिवसांमध्ये शुभ अशुभ घटनांचं भाकीत ज्योतिषशास्त्राने केलं आहे. (Kendra Trikon position of major planets in Libra solstice or tula sankranti Big threat in next 30 days astrological predictions)

'या' नेत्यांवर होणार ग्रहांचा वाईट परिणाम

18 ऑक्टोबरला सूर्याच्या तूळ राशीत भ्रमणाच्या वेळी सूर्य गुरू, मंगळ, या प्रमुख ग्रहांसह केंद्रस्थानी असणार आहे. राहू केतू आणि शनी केंद्रस्थानी असून ते त्रिकोणात येणे काही मोठ्या धोक्याचे संकेत असल्याचं ज्योतिषशास्त्रात भाकीत आहे. या त्रिकोणचा परिणाम दीर्घकाळ राहणार असून या योगामुळे भारतावरही विपरीत परिणाम दिसणार असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि चंद्र हे राजसिक ग्रह मानले जातात. त्यामुळे तूळ संक्रांतीच्या वेळी सूर्य, मंगळ आणि केतूच्या संयोगाने अनेक जण त्रस्त असणार आहे. त्यात चंद्रावर शनि ग्रहाचा पैलू हा जगातील राजकारणावर नकारात्मक परिणाम दाखवणार आहे. विशेषत: जो बिडेन, बेंजामिन नेतान्याहू आणि नरेंद्र मोदी यांच्या तब्येत बिघाड किंवा राजकीय गोंधळ होण्याचे संकेत ज्योतिषशास्त्राने दिलं आहे. 

इस्त्रायल हमास युद्धात हिजबुल्लाहची एन्ट्री

सूर्य संक्रांतीच्या अवघ्या एक दिवसानंतर बुध तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे सूर्य, केतू आणि मंगळ यांच्या अशुभ संयोग घडणार आहे. या परिणाम इस्त्रायलवर याचा वाईट परिणाम दिसून येणार आहे. हिजबुल्लाहची युद्धात एन्ट्री होणार आहे, असं भाकीत ज्योतिषशास्त्राने केले आहे.  2006 मध्ये पहिल्या 34 दिवसांच्या युद्धात हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचा इस्रायलकडून पराभव झाला होता.  मात्र यावेळी ते कडवी टक्कर देण्याचा तयारी आहेत. या ठिकाणी हे लक्षात घ्यायला हवं की, लेबनॉनमध्ये 8000 भारतीय सैनिक संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेत कार्यरत आहेत. ज्यांच्यासाठी पुढील एक महिना कठीण असणार आहे. येत्या एक महिन्यात राहू-राहू-गुरूच्या स्थितीमुळे युद्धात अघटीत घटना घडण्याची शक्यता आहे, असं भाकीत ज्योतिषशास्त्राने केलं आहे. 

भारताच्या उत्तर-पश्चिम आणि उत्तर-पूर्व भागात धोका!

सूर्यदेव तूळ राशीत संक्रमण केल्यानंतर मंगळ, केतू राशीत प्रतिगामी शनि कुंभ राशीत अशा ही स्थिती घातक ठरणार आहे. आग, भूकंप आणि हिंसक घटनेसोबत जीवित आणि मालमत्तेची हानी होण्याची दाट शक्यता ज्योतिषशास्त्राने व्यक्त केली आहे. तरदुसरीकडे सूर्य, बुध आणि केतू यांचं चित्रा नक्षत्रातील संक्रमण आणि धनिष्ठा नक्षत्रात शनिचे भ्रमण यामुळे अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होणार आहे. अर्थव्यवस्थेत काहीशी घसरण, सोन्याच्या भावात वाढ आणि शेअर बाजारात गडबड होण्याची शक्यता आहे. 

 सूर्याच्या तूळ संक्रांतीच्या वेळी, राहू आणि गुरू, उत्तर-पूर्व दिशेला पुढे जात आहे. तर मंगळ आणि चंद्र दक्षिण-पश्चिम दिशेने फिरून एकमेकांना छेदणार आहे.  त्यामुळे मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा बिघण्याची शक्यता आहे. सूर्य संक्रांतीच्या वेळी चंद्र पाचव्या भावात आणि शनिच्या स्थितीत क्रीडा विश्व आणि चित्रपटसृष्टीत अचानक वाईट संकेत येणार आहेत. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)