Ketu-Chandrama Yuti : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या ठराविक वेळेनंतर आपल्या राशीमध्ये गोचर करतात. ग्रहांच्या या गोचरमुळे शुभ आणि अशुभ योग तयार होताना दिसतात. दरम्यान याचा परिणाम मानवी जीवनावर होताना दिसतो.
येत्या 21 ऑगस्ट रोजी तूळ राशीमध्ये केतू आणि चंद्राचा संयोग झाला आहे. दरम्यान केतू आणि चंद्राच्या युतीमुळे ग्रहण दोष तयार झाला आहे. या ग्रहण दोषाचा परिणाम अनेक राशींवर होताना दिसणार आहे. मात्र यावेळी 3 राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी हा कठीण काळ असणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
ग्रहण दोष तुमच्यासाठी हानिकारक सिद्ध होऊ शकणार आहे. या काळामध्ये चंद्र आणि केतूचा संयोग तुमच्या राशीतून सहाव्या घरात तयार होत आहे. या काळात तुमचं आरोग्य बिघडण्याची अधिक शक्यता आहे. घाई - घाईत कोणताही निर्णय घेणं टाळावं. वायफळ खर्च होऊ शकतात. या खर्चांमुळे तुमचं संपूर्ण बजेच बिघडण्याची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थताही राहू शकते. काही जुने आजार उद्भवू शकतात.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ग्रहण दोष निर्माण होणं प्रतिकूल ठरू शकणार आहे. कारण तुमच्या संक्रमण कुंडलीच्या 12व्या घरात चंद्र आणि केतूचा संयोग होणार आहे. कामाच्या ठिकाणी वाद विवाद होऊ शकतात. त्यामुळे यावेळी तुम्हाला व्यर्थ प्रवास करावा लागू शकतो. सट्टा, लॉटरी आणि शेअर बाजारात गुंतवणूक करू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. तुमचा जोडीदार आणि भावंडांसोबत वियोग होऊ शकतो.
ग्रहण दोष निर्माण होणं तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकणार आहे. तुमच्या राशीतून आठव्या भावात चंद्र आणि केतू यांचा संयोग होतोय. या काळात तुम्हाला घशाचा त्रास होऊ शकतो. यावेळी कोणत्याही ठिकाणी पैसे गुंतवू नका. जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरीशी संबंधित अडचणी दिसतील. जोडीदाराच्या आरोग्यावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )