मेष - कामात जबाबदारी वाढू शकते. दिवसभर व्यस्त राहाल. व्यवसायात काही गोष्टी समजूतीने सोडवाल. यश मिळेल. प्रवासाची योजना आखू शकता. समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न कराल.
वृषभ - जुन्या समस्या संपतील. स्वत:कडे लक्ष द्या. नवीन कपड्यांची खरेदी करु शकता. सक्रीय राहाल. कामं पूर्ण होतील. नवीन कल्पना येतील. खर्च आणि उत्पन्नाकडे लक्ष द्यावे लागेल. यशासाठी धैर्य आवश्यक आहे. मित्रांची मदत मिळेल.
मिथुन - धनलाभ होऊ शकतो. अनेक काळ चालणाऱ्या कामाचा फायदा होऊ शकतो. अविवाहितांना विवाह प्रस्ताव येऊ शकतात. मित्र, कुटुंबाकडून मदत मिळेल. चांगली बातमी मिळू शकते. आनंदी राहाल. बेरोजगार लोकांसाठी दिवस चांगला आहे.
कर्क - अचानक धनलाभ होऊ शकतो. रखडलेले पैसे मिळू शकतात. मित्रांची मदत होऊ शकते. गैरसमज असल्यास लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यवहारकुशलता आणि सहनशक्तीने काम केल्यास अधिक गोष्टी आपोआप सुटू शकतील.
सिंह - आर्थिक स्थितीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आनंदी वाटेल. महत्त्वाकांक्षी राहाल. कामानिमित्त प्रवास होऊ शकतो. अधिकारी खुश राहतील. ऑफिसमधील तणावपूर्ण स्थिती कमी होऊ शकते. मेहनत आणि समजूतीने कामं लवकर पूर्ण होतील.
कन्या - कामात नवीन प्रयोग केल्यास फायदा होऊ शकतो. दिवस चांगला आहे. अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल. जोडीदारासोबत वेळ जाईल. रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात.
तुळ - विचार करत असलेल्या कामाची सुरुवात करु शकता. फायदा होईल. मन प्रसन्न राहील. सामाजिक कामांसाठी दिवस चांगला आहे. कुटुंबातील अनेक कामं करावी लागतील. मित्रांसोबत वेळ जाईल. गुंतवणूकीसाठी योजना आखू शकता. धनलाभ होऊ शकतो.
वृश्चिक - दिवस चांगला आहे. काही अशा गोष्टी समोर येऊ शकतात, ज्याचा दिवसभरात फायदा होईल. समस्या सोडवण्यासाठी दिवस चांगला आहे. तुमच्या समजूतदारपणाचा वापर करा. तब्येत चांगली राहील. कामाच्या ठिकाणी ओळखीचा फायदा होऊ शकतो.
धनु - नोकरी, व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. नवीन नोकरीच्या प्रयत्नांत असल्यास यश मिळू शकते. उत्साही राहाल. नवीन लोकांशी संपर्क होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अनेक लोक तुमच्याशी सहमत असतील.
मकर - महत्त्वपूर्ण काम करु शकता. यातून फायद्याची शक्यता आहे. पूर्ण मेहनत करावी लागेल. नवीन काम करण्याआधी, राहिलेली कामं पूर्ण करा. अविवाहितांसाठी दिवस चांगला आहे.
कुंभ - दिवसभर पैशांविषयी विचार कराल. धीर ठेवा. प्रॉपर्टीच्या कामातून धनलाभ होऊ शकतो. नवीन काम मिळू शकतं. तब्येत ठिक राहील.
मीन - मनात नवीन विचार येऊ शकतो. त्यावर लगेच निर्णय घेऊ शकता. कागदोपत्री कामं पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. फिरण्यासाठी दिवस चांगला आहे. तब्येत चांगली राहील.