आजचे राशिभविष्य | रविवार | २९ सप्टेंबर २०१९

कसा असेल तुमचा आजचा दिवस 

Updated: Sep 29, 2019, 09:53 AM IST
आजचे राशिभविष्य | रविवार | २९ सप्टेंबर २०१९ title=

मेष - आज शुभ वार्ता मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक संबंध चांगले राहतील. अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामात यश मिळू शकते. नवीन अनुभव येण्याची शक्यता आहे. समस्यांवर मार्ग काढू शकता. 

वृषभ - दिवस चांगला आहे. मुलांसोबत अधिक वेळ घालवा. पैशांबाबतीत गोष्टींकडे लक्ष द्या. उत्साही राहाल. आत्मविश्वास वाढेल. सोबत काम करणाऱ्यांची मदत मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी तुमचा सल्ला महत्त्वाचा ठरु शकतो.

मिथुन - स्वत:च्या योजनांवर विश्वास ठेवा. पैशांच्या बाबतीत चांगल्या ऑफर येऊ शकतात. त्यावर गंभीरतेने विचार करा. तुमच्या जबाबदाऱ्या आणि महत्त्वाची कामं पूर्ण करा. विद्यार्थ्यांना यश मिळेल. महिलांसाठी दिवस चांगला आहे.

कर्क - लोकांशी ओळखी होऊ शकतात. दिवस चांगला आहे. धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. अचानक धनलाभ होऊ शकतो. व्यावसायात प्रगती होण्याची शक्यता आहे.

सिंह - महत्त्वाच्या गोष्टींमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सामिल होण्याचा योग आहे. पैशांसंबंधी नवे मार्ग खुले होण्याची शक्यता आहे.

कन्या - दिवस चांगला आहे. मुलांसोबत आनंदाचे क्षण घालवू शकता. सकारात्मक राहाल. कामात व्यस्त राहाल. कामं वेळेत पूर्ण होतील. काही समस्या असल्यास त्या सोडवल्या जाऊ शकतात. व्यवसायात धनलाभाची शक्यता आहे.

तुळ - नवीन लोकांशी ओळख होऊ शकते. ज्यामुळे फायदा होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभाग घेऊ शकता. व्यवसायात महत्त्वाच्या निर्णयासाठी दिवस चांगला ठरु शकतो. 

वृश्चिक - नवीन माहिती मिळू शकते. चांगल्या संधी आल्यास त्याचा फायदा करण्याचा प्रयत्न करा. नशिबाची साथ मिळू शकते. तब्येतीची काळजी घ्या. 

धनु - आत्मविश्वास आणि उत्साही राहाल. नवीन गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यातून नवीन मार्ग मिळण्याची शक्यता आहे. संधी सोडू नका. वाद-विवादात तुम्ही वरचढही ठरु शकता. 

मकर - खासगी समस्या असल्यास त्या सोडवल्या जाऊ शकतात. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. करियरसाठी दिवस चांगला आहे. लोकांच्या भेटीतून एखाद्या गोष्टीवर मार्ग मिळण्याची शक्यता आहे. नव्या सुरुवातीसाठी दिवस चांगला आहे. तब्येतीकडे लक्ष द्या.  

कुंभ - कायद्यासंबंधी प्रकरणात चांगली बातमी मिळू शकते. मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतो. लोकांशी भेटी होऊ शकतात. घरातील वातावरण चांगले राहील. प्रवास होऊ शकतो. 

मीन - आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात यश मिळू शकते. अचानक भेटी होऊ शकतात. विचार करुनच बोला. तुमच्या गोष्टी इतरांशी शेअर करु शकता. तब्येतीची काळजी घ्या.