Kojagiri or Sharad Purnima 2023 : हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी म्हणून ओळखलं जातं. तब्बल 9 वर्षांनी शरद पौर्णिमेला चंद्रग्रहण आहे. या वर्षातील शेवटचं आणि दुसरं चंद्रगहण आहे. संपूर्ण वर्षातील हे एकमेव ग्रहण आहे जे भारतात दिसणार आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. चंद्रग्रहणाची सावली असताना कोजागिरी पौर्णिमेची पूजा करता येईल का? (Kojagiri Poornima or Sharad Purnima 7 auspicious yogas along with lunar eclipse laxmi puja muhurat vidhi mantra significance and moonrise timings and Kojagiri puja marathi video)
पौर्णिमा तिथी सुरु - 28 ऑक्टोबर पहाटे 4:17 वाजता
पौर्णिमा तिथी समाप्त - 29 ऑक्टोबर दुपारी 1.53 वाजता
उदय तिथीनुसार - 28 ऑक्टोबरला कोजागिरी किंवा शरद पौर्णिमा साजरी केली जाणार
स्नान आणि दान करण्याची वेळ - 28 ऑक्टोबरला पहाटे 4:47 ते सकाळी 5.39 वाजेपर्यत
सत्यनारायण पूजेची वेळ - सकाळी 7.54 ते सकाळी 9.17
कोजागिरी चंद्रोदयाची वेळ - संध्याकाळी 5.20 वाजता
कोजागिरीच्या रात्री लक्ष्मी देवीची पूजा करण्यासाठी यंदा 3 मुहूर्त आहेत.
पहिला मुहूर्त - रात्री 8:52 ते 10:29 पर्यंत
दुसरा मुहूर्त - रात्री 10:29 पासून ते 12:05 पर्यंत
तिसरा मुहूर्त - रात्री 12:05 पासून ते 1:41 पर्यंत आहे.
कोजागिरी किंवा शरद पौर्णिमेला बुधादित्य योग, त्रिग्रही योग, गजकेसरी योग, षष्ठ योग, रवि योग आणि सर्वार्थ सिद्धी योग यांचा संयोग आहे.
घरातील मंदिर स्वच्छ करुन देवी लक्ष्मी आणि विष्णू देवाच्या पूजेची तयारी करावी. त्यानंतर पाटावर लाल पिवळं कापड परिधान करा. त्यावर देवी लक्ष्मी आणि विष्णू देवाची मूर्ती स्थापित करा. देवासमोर तूपाचा दिवा लावून गंगाजल शिंपडा आणि अक्षता, कुंकूचा टिळा लावा. आता फुलं, गुलाब आणि मिठाईचा प्रसाद नैवेद्य म्हणून ठेवा.ही पूजा झाल्यानंतर लक्ष्मी देवीला दूध किंवा खीरचा प्रसाद नक्की दाखवा. त्यानंतर ही खीर किंवा दूध चंद्रप्रकाशात ठेवा आणि नंतर त्याचं सेवन करा.
ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः
ऊं यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धन धान्याधिपतये
धन धान्य समृद्धिं मे देहि दापय स्वाहा।।
दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णव सम्भवम ।
नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुट भूषणं ।।
पौराणिक मान्यतेनुसार कोजागिरी पौर्णिमेला समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी प्रकट झाली होती. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमा हा सण देवी लक्ष्मीजा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रात्री जागरण करून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की, पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने मानवाच्या जीवनातील सर्व संकट नाहीसे होतात. त्यासोबत सुख समृद्धी आणि धनाची प्राप्ती होते. त्यामुळे कोजागिरीची पूजा अतिशय शुभ मानली जाते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 175/6
|
VS |
SA
74(12.3 ov)
|
| India beat South Africa by 101 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
MAS
(20 ov) 201/9
|
VS |
PHI
87/9(20 ov)
|
| Malaysia beat Philippines by 114 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 80/9
|
VS |
INA
81/5(16.2 ov)
|
| Indonesia beat Thailand by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.