Mangal Gochar 2023 : आगामी 36 दिवस 'या' राशींवर बसरणार पैसाच पैसा; नशीबही देणार साथ

Mangal Gochar 2023 : नुकतंच मंगळ ग्रह गोचर केलं आहे. मंगळाच्या या गोचरचा परिणाम प्रत्येक राशीतील व्यक्तींवर वेगवेगळा होणार आहे. त्यामुळे आगामी येणारे 36 दिवस काही राशींसाठी खूप फायदेशीर असणार आहेत.

सुरभि जगदीश | Updated: Jul 12, 2023, 09:27 PM IST
Mangal Gochar 2023 : आगामी 36 दिवस 'या' राशींवर बसरणार पैसाच पैसा; नशीबही देणार साथ title=

Mangal Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक वेळेनंतर प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो. या राशी बदलामुळे काही राशीच्या लोकांना शुभ किंवा अशुभ फळ मिळतात. नुकतंच मंगळ ग्रह गोचर केलं आहे. मंगळाच्या या गोचरचा परिणाम प्रत्येक राशीतील व्यक्तींवर वेगवेगळा होणार आहे. 

1 जुलै रोजी मंगळ ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केलाय. मंगळ ग्रह 17 ऑगस्टपर्यंत ते या राशीत राहणार आहे. मंगळ हा धैर्य, शौर्य आणि विवाहाचा कारक मानला जातो. त्यामुळे आगामी येणारे 36 दिवस काही राशींसाठी खूप फायदेशीर असणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 

मिथुन रास

ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ सिंह राशीत प्रवेश केला असून याचा विशेष लाभ या राशीला मिळणार आहे. मिथुन राशीच्या लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. यासोबतच तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे. एका ठिकाणी पैसे गुंतवून तुम्हाला नफा मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळणार आहे.

धनु रास

मंगळाच्या गोचरमुळे धनु राशीच्या लोकांना अनुकूल परिणाम मिळताना दिसतील. व्यावसायिकांना या काळात विशेष लाभ होणार आहे. पदोन्नतीच्या मिळण्याच्या संधी आहेत. भाग्य तुमच्या सोबत राहील. कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतात. नोकरीच्या ठिकाणी लाभ होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होतील. परदेश दौऱ्याची शक्यता आहे. 

मीन रास

ज्योतिष शास्त्रानुसार मीन राशीच्या लोकांसाठी येणारे 36 दिवस खूप खास असणार आहेत. या काळात तुमचे विरोधक पराभूत होणार आहे. आर्थिक गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. या दरम्यान या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये खूप प्रगती होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे. धार्मिक व्यक्तींना हा काळ विशेषतः अनुकूल वाटू शकतो.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )