Mangal Uday 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्यांच्या ठराविक काळानंतर राशीत बदल करतात. यावेळी काही ग्रहांचा उदय आणि अस्त देखील होणार आहे. या बदलाचा देखील सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होत असतो. 23 सप्टेंबर रोजी मंगळाचा अस्त झाला असून तो 85 दिवस कन्या राशीत राहणार आहे. अशा स्थितीत ग्रहस्थितीमुळे काही राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं असणार आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ 24 सप्टेंबर रोजी कन्या राशीत अस्त झाला आहे आणि 17 जानेवारी 2024 या स्थितीत राहणार आहे. मंगळाच्या अस्तामुळे हा काळ वृषभ आणि मेष राशीसह काही राशींसाठी अत्यंत धोकादायक असणार आहे. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना काय काळजी घ्यावी लागणार आहे ते पाहूया.
ज्योतिष शास्त्रानुसार, मेष राशीच्या लोकांसाठी मंगळाची स्थिती कठीण परिस्थिती आणणार आहे. या काळात मंगळ तुमच्या सहाव्या भावात स्थित आहे. अशा परिस्थितीत हा काळ तुमच्यासाठी आव्हानांनी भरलेला असणार आहे. व्यावसायिकांना कामात विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण राहणार आहे. कामामध्ये नुकसान होऊ शकते.
वृषभ राशीच्या लोकांना मंगळाच्या अस्ताचे प्रतिकूल परिणाम दिसून येणार आहेत. या लोकांना यावेळी खूप कष्ट करावे लागतणार आहेत. कठोर परिश्रम करूनही, तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत. नोकरी करणारे लोक समाधानी दिसणार नाही. तुम्हाला उत्पन्नात अडथळे येतील. कामाच्या ठिकाणी तुमच्याकडून मोठ्या चुका होतील.
ज्योतिष शास्त्रानुसार, कर्क राशीच्या लोकांसाठी मंगळाची स्थिती अनुकूल राहणार नाही. या काळात तुम्ही कामात यश मिळवण्यात अपयशी ठराल. तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. दूरचा प्रवास केल्याने नुकसान होऊ शकते. तुमच्या पैशांचं नुकसान होणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाची स्थिती कठीण काळ घेऊन येणार आहे. अशा स्थितीत मंगळ तुमच्या 12व्या घरात बसेल. यावेळी अपेक्षित परिणाम न मिळाल्याने तुमची चिंता वाढणार आहे. नोकरीशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्याचबरोबर व्यापार उद्योगात तुम्हाला नुकसान सहन करावं लागणार आहे. कामात अनेक अडथळे येऊ शकतात.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )