Budh Uday 2023 : फक्त 7 दिवस, बुध उदयमुळे 3 राशींसाठी उघडणार कुबेराचा खजिना

Mercury Uday 2023 : लवकरच ग्रहांचा राजकुमार बुध उदय होणार आहे. त्यामुळे 3 राशींसाठी कुबेराचा खजिनाचा दरवाजा उघणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jul 3, 2023, 02:52 PM IST
Budh Uday 2023 : फक्त 7 दिवस, बुध उदयमुळे 3 राशींसाठी उघडणार कुबेराचा खजिना title=
mercury uday budh planet rise in cancer these zodiac sign will shine success and money

Budh Uday 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्र एका ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतो. चंद्र हा सर्वात लवकर तर शनि सर्वात हळू एका घरातून दुसऱ्या घरात प्रवेश करतो. ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह लवकरच उदय स्थितीत येणार आहे. बुध ग्रह हा ज्ञान, बुद्धिमत्ता, व्यवसाय, गणित आणि तर्कशास्त्राचा कारक मानला जातो. त्यामुळे जेव्हा कधी बुध आपली स्थिती बदलतो तेव्हा काही राशींचे नशिब सूर्यासारखं चमकतं. 11 जुलैला बुध उदय स्थितीत येणार आहे. त्यामुळे 3 राशींना धनलाभ होणार आहे. (mercury uday budh planet rise in cancer these zodiac sign will shine success and money)

मकर (Capricorn)

11 जुलैला राजकुमार बुध उदय स्थिती आल्यानंतर मकर राशीच्या लोकांना सर्वाधिक फायदा होणार आहे. या राशीच्या सातव्या घरात बुध ग्रह उदय स्थितीत असणार आहे. तर तो कुंडतील नवव्या आणि सहाव्य घराचा स्वामी असणार आहे. प्रगती आणि यश तुमच्या दार ठोठवणार आहे. विवाह इच्छुक लोकांचे लग्न ठरणार आहे. भागीदारीच्या व्यवसायातून फायदा होणार आहे. 

हेसुद्धा वाचा - Weekly Money Horoscope : शुक्र आणि बुध गोचरमुळे 'या' राशी होणार श्रीमंत, तुमच्यासाठी कसा आहे हा आठवडा?

कन्या (Virgo)

बुध उदय कन्या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. कन्या राशीच्या कुंडलीतील उत्पन्न घरात बुधाचा उदय होणार असल्याने या लोकांना धनलाभाचे योग आहे. तुमचा आत्मविश्वास उंच शिखरावर असणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या नोकरीची उत्तम संधी मिळणार आहे. नोकरी आणि व्यवसायात फायदा होणार आहे. व्यावसायिक नवीन करार करणार आहेत. 

मिथुन (Gemini)

राजकुमार बुध उदय मिथुन राशीच्या लोकांसाठी अच्छे दिन घेऊन आला आहे. या राशीच्या संपत्तीच्या घरात बुध उदय होणार आहे. तुम्हाला अचानक मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. मालमत्ता आणि वाहन खरेदीचे योग जुळून आले आहेत. जमीन किंवा मालमत्तातून आर्थिक फायदा होईल. 

हेसुद्धा वाचा - Shukra Vskri : शुक्र 'या' राशीच्या लोकांना बनवेल श्रीमंत, 'या' दिवसापासून तिजोरीवर 7 ऑगस्टपर्यंत लक्ष्मीची कृपा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)