Budh Gochar November 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार बुधदेव नोव्हेंबर महिन्यात दोन वेळा आपली स्थिती बदलणार आहे. बुध हा व्यवसाय, बुद्धिमत्ता, तर्क, अर्थकारण, वाणी आणि संवादाचा कारक आहे. प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर आपली रास बदलतो. बुध ग्रह हा महिन्यातून एकदा संक्रमण करतो. पण नोव्हेंबर महिन्यात बुध देव दोनदा आपली राशी परिवर्तन करणार आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध 6 नोव्हेंबरला वृश्चिक तर 27 नोव्हेंबरला धनु राशीत गोचर करणार आहे. बुधाच्या या संक्रमणामुळे 3 राशीच्या लोकांच्या तिजोरीत ठेवायला कमी पडले एवढ्या पैशा मिळणार आहे. आर्थिक लाभामुळे या राशींचा नोव्हेंबर महिना अख्खी दिवाळी असणार आहे. (Mercury will transit 2 times in November The golden days of these zodiac signs will come and Budh gochar in november)
ग्रहांचा राजकुमार बुधदेव तुमच्यासाठी लकी ठरणार आहे. बुध संक्रमणामुळे तुमचं भाग्य उजळणार आहे. अडकलेली कामं मार्गी लागणार आहे. धार्मिक कार्यात तुमचा रस वाढणार आहे. पैशाशी संबंधित कामात तुम्हाला यश मिळणार आहे. नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवासाचे योग आहेत. संशोधन क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी बुधदेव फायदेशीर ठरणार आहे. स्पर्धात्मक विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम असणार आहे. तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे.
बुध ग्रहाचे दोनदा राशी बदल कन्या राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. तुम्ही वाहन आणि मालमत्ता खरेदी करु शकता. धैर्य आणि शौर्य तुमच्यासोबत असणार आहे. अनपेक्षित आर्थिक लाभामुळे तुमचं बँक बॅलेन्स वाढणार आहे. बहीण भावामधील नातं मजबूत होणार आहे. बुधाच्या संक्रमणामुळे वडिलोपार्जित संपत्तीतही घवघवशीत वाढ होणार आहे. नोकरदार लोकांना पदोन्नती आणि उत्तम करिअरच्या संधी मिळणार आहे.
नोव्हेंबर महिन्यातील बुधाचं दोनदा गोचर मकर राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होणार आहे. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होणार आहे. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. तुम्हाला पैसे मिळणार आहे. बुध संक्रमणामुळे तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदलही होणार आहेत. तुमच्या नवीन योजनांना यश प्राप्त होणार आहे. पैशा बचत करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. स्टॉक मार्केट, बेटिंग आणि लॉटरीमध्ये पैसे गुंतवणे तुमच्या फायद्याचं ठरणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)