Astro Upay : कुंडलीतील 'हे' 3 ग्रह दारिद्र्याचे लक्षण, गरीब आणि कर्जबारी होण्यापासून वाचण्यासाठी करा उपाय

Grah Remedies : अपार मेहनत आणि कष्ट करुनही अनेकांच्या पदरी निराशा येते. सतत पैशाची चणचण, दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणामुळे जर तुम्ही त्रस्त असाल. तर कुंडलीतील हे तीन ग्रह कारणाभूत असतात. 

Updated: Feb 11, 2023, 09:16 AM IST
 Astro Upay : कुंडलीतील 'हे' 3 ग्रह दारिद्र्याचे लक्षण, गरीब आणि कर्जबारी होण्यापासून वाचण्यासाठी करा उपाय title=
money astrology astro tips for money shani mangal and rahu horoscope are poor and indebted and upya remedies in marathi

Grah Effect On Money : व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहांच्या वाईट स्थितीचा प्रभाव असतो. अशा परिस्थितीत माणसाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आर्थिक स्थिती ढासळू लागते, व्यक्ती कर्जात बुडू लागतो आणि गरीब होतो. हे सर्व क्रूर आणि अशुभ ग्रहांच्या वाईट स्थितीमुळे घडतं. हे तीन ग्रह व्यक्तीच्या आर्थिक स्थितीसाठी जबाबदार मानले जातात. कुंडलीतील त्यांची वाईट स्थिती व्यक्तीला प्रत्येक पैशावर अवलंबून बनवते, असं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं. चला जाणून घेऊयात त्या तीन ग्रहांबद्दल...(money astrology astro tips for money shani mangal and rahu horoscope are poor and indebted and upya remedies in marathi)

'हे' तीन ग्रह असल्यास सावधान!

राहू 

ज्योतिषशास्त्रात राहू ग्रहाला सावली ग्रह असं म्हटलं जातं. त्यामुळे जेव्हा तुमच्या कुंडलीतील शुभ ग्रहांसोबत राहू येतो तेव्हा तुमच्या आयुष्यात चांगले परिणाम दिसतात. पण जर राहू हा अशुभ ग्रहाच्या सोबत असेल तर याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर पडतो. आर्थिक संकट आणि आरोग्यावर याचा वाईट परिणाम होतो. तुम्ही पैशापैशासाठी तरसता. आरोग्याच्या अनेक समस्या सुरु होतात. ज्योषिशास्त्रात यासाठी खालील उपाय सांगितला आहे. 

उपाय - ऊँ रां राहवे नम:या मंत्राचा नियमित जप करा.

शनी 

हे अनेकांना माहिती आहे शनि हा ज्याचा कुंडलीत असेल त्याचे वाईट दिवस असतात. शनी ग्रह म्हणजे तुमची साडेसातीचा काळ असतो. शनी हा संथ ग्रह म्हणून ओळखला जातो. त्यामुळे तो तुमच्या कुंडलीत दीर्घकाळ राहतो आणि तो सहजासहजी जात नाही. शनीची साडेसाती सुरु असल्यास तुमची आर्थिक स्थिती ढासळते आणि वैवाहित जीवनात संकट येतात. यावर ज्योतिषशास्त्रात उपाय देखील सांगण्यात आला आहे. 

उपाय - शनिवारी मोहरीचे तेल अर्पण करा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. शनिदोष टाळण्यासाठी घोड्याच्या बुटाची अंगठी बनवून मधल्या बोटात घालावी.

मंगळ

मंगळ ग्रह हा अशांतेचा प्रतिक आहे. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ ग्रह असेल त्याचा आयुष्यात आशांतता पसरते. जर तुमच्या कुंडलीत मंगळ सहाव्या, आठव्या आणि दहाव्या घरात असल्यास तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. जर मगंळ हा सहाव्या घरात असेल तर तुमच्यावर कर्जाचे बोझे वाढते, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. अशावेळी शास्त्रा याबाबत उपायही सांगण्यात आले आहेत. 

उपाय - मंगळवारी हनुमानजींची पूजा करा. ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार प्रवाळ रत्न धारण करा. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)