Saturn Transit 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रातील महत्त्वाचा ग्रह न्यायदेवात शनिच्या कृपाने एखाद्याला राजा बनवतो. 30 वर्षांनंतर शनी मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीत भ्रमण करत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी 2023 मध्ये शनीने स्वगृही कुंभ राशीत प्रवेश केला आहे. त्यानंतर जून 2023 शनिदेव वक्री स्थिती गेला. आता शनिदेव मार्गी होणार आहे. दिवाळापूर्वी म्हणजे 4 नोव्हेंबरला शनिदेव मार्गी होणार असून 30 जून 2024 तो या स्थिती असणार आहे. शनि मार्गीमुळे 12 राशींवर परिणाम होणार आहे. खास करुन तीन राशींचे 30 जून 2024 पर्यंत अच्छे दिन असणार आहे. या लोकांना यश प्रगतीसोबत अपार धनलाभ होणार आहे. यात तुमच्या राशीचा समावेश आहे का जाणून घ्या. (Shani Margi before Diwali 4 November till 30 June 2024 saturn will rain Immense wealth with success and progress these zodiac signs)
कुंभ राशीत शनिचे प्रत्यक्ष असणे या राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांना नोकरी आणि व्यवसायात भरपूर फलदायी ठरणार आहे. उच्च पदासोबत उत्पन्न वाढ होणार आहे. तुमच्या आर्थिक स्थितीत द्विगुणीत वाढ होणार आहे. मालमत्तेशी संबंधित मोठं फायदा होणार आहे. नवीन नोकरीत उत्तम संधी तुम्हाला मिळणार आहे. व्यवसायिकांवर शनिदेवाची कृपा बरसणार आहे. हा काळ तुमच्यासाठी एकामागून एक अनेक यश देऊन येणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी शनीची थेट हालचाल वरदान ठरणार आहे. या लोकांना शनिची प्रत्यक्ष ग्रहस्थिती असल्यास प्रत्येक कामात यश प्राप्त होणार आहे. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होणार आहे. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत स्थितीत येणार आहे. आयुष्यातील समस्या सहज दूर होणार आहे. नोकरीत चांगल्या संधी उपलब्ध होऊन तुमचा मान सन्मान वाढणार आहे.
या राशीच्या लोकांना शनि खूप लाभदायक ठरणार आहे. या लोकांना प्रत्येक क्षेत्रात लाभ आणि यश प्राप्त होणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही खूप प्रगती होणार आहे. तुम्हाला अचानक खूप पैसे लाभणार आहे. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खूप सुधारणार आहे. जे लोक अनेक वर्षांपासून आपल्या नोकरीबद्दल चिंतेत आहेत त्यांना मेहनतीचं उत्तम फळ मिळणार आहे. व्यवसायासाठीही हा काळ वरदान ठरणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)