हातावरील ही रेष, म्हणजे संपत्तीचं प्रचंड बळ; पाहा तुमच्या हातावर ही श्रीमंतीची रेष आहे का

हातावरची भाग्य रेषा काय सांगते ?

Updated: Apr 3, 2022, 06:00 PM IST
हातावरील ही रेष, म्हणजे संपत्तीचं प्रचंड बळ; पाहा तुमच्या हातावर ही श्रीमंतीची रेष आहे का  title=

मुंबई : हस्तरेखा शास्त्रानुसार अमुक एक व्यक्ती त्याच्या आयुष्यात किती पुढे जाणार, किती यशस्वी होणार हे सर्वकाही त्याच्या हातावर असणाऱ्या रेषा अगदी स्पष्टपणे सांगतात. हातावर असणाऱ्या रेषांच्या माध्यामातून भविष्याबाबतही बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो.  शिवाय शिक्षण, नोकरी हे सारंकाही या रेषा उलगडून सांगतात.

हातावरची भाग्य रेषा काय सांगते ?

हस्तरेषा शास्त्रामध्ये भाग्यरेषेला फार महत्त्वं आहे. ही रेष व्यक्तीच्या यशावर भाष्य करते. भाग्य रेषा चांगली असल्यास व्यक्ती धनवान, सुखी आणि सर्वतोपरि परिपूर्ण असतो. शिवाय अशा व्यक्तींना मोठं पद आणि समाजात मानाचं स्थानही मिळतं.

कशी ओळखाल भाग्यरेषा ?

जेव्हा कोणतीही रेष मणिबंध (मनगटाजवळ) पासून सुरु होऊन थेट मधल्या बोटाला म्हणजेच शनी पर्वताला जाऊन मिळते ती भाग्यरेषा असते. प्रत्येक व्यक्तीच्या हाती भाग्यरेषा असते. कोणाची भाग्यरेषा लांब असते.

कोणाची तुटक, किंवा कोणाच्या हाती वेडीवाकडी अशी ही रेषा पाहायला मिळते. पण, यातही सरळ रेष अधिक महत्त्वाची.

हस्तरेषा शास्त्रानुसार ज्यांची भाग्यरेषा मनगटापासून थेट मधल्या बोटापर्यंत जाते ते कमालीचे नशीबवान असतात. अशी मंडळी फार महत्त्वाकांक्षी आणि एककेंद्री असतात. त्यांच्या नशिबात संपत्ती आणि श्रीमंतीचा मोठा योग असतो. नोकरीमध्ये या मंडळींना मोठा हुद्दा आणि समाजातही अपरंपार आदर मिळतो.

तुमची भाग्यरेषा काय सांगते? काय म्हणता तुम्हीही आहात का प्रचंड नशिबवान?

 

(वरील माहितीबाब झी 24 तास खातरजमा करत नाही.)