Sankashti Chaturthi 2023 : आजची संकष्टी चतुर्थी खास! पूजा मुहूर्त आणि चंद्रोदय वेळ जाणून घ्या

Sankashti Chaturthi May 2023 Date : प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येते. मे महिन्यातील संकष्टी चतुर्थी खूप जास्त खास आहे. जाणून घ्या  तारीख, पूजा मुहूर्त आणि चंद्रोदय वेळ 

नेहा चौधरी | Updated: May 8, 2023, 06:20 AM IST
Sankashti Chaturthi 2023 : आजची संकष्टी चतुर्थी खास! पूजा मुहूर्त आणि चंद्रोदय वेळ जाणून घ्या title=
Sankashti Chaturthi 2023 Ekdant sankashti chaturthi date puja muhurat vidhi significance jyeshta chaturthi Shiv Yog

Ekdant Sankashti Chaturthi 2023 : विघ्नहर्ता गणरायाची आराधना आणि उपवास करण्यासाठी चतुर्थीचं व्रत हिंदू धर्मात अतिशय महत्त्वपूर्ण आहे. वर्षात एकून 24 चतुर्थी येत असून महिन्याला एक संकष्टी (Sankashti Chaturthi 2023) आणि विनायक चतुर्थी येतं असते. मे महिन्यातील संकष्टी अतिशय खास आहे.  ज्येष्ठ कृष्ण पक्षातील तिथीवर येणाऱ्या एकंदत संकष्टी चतुर्थी (Ekdant Sankashti Chaturthi 2023) असं म्हटलं जातं. यादिवशी सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास केल्यास तुमच्यावरील सर्व संकटं दूर होतात आणि अपार सुखाची प्राप्ती होते असं म्हणतात. (Sankashti Chaturthi 2023 Ekdant sankashti chaturthi date puja muhurat vidhi significance jyeshta chaturthi Shiv Yog)

संकष्टी चतुर्थी 2023 तारीख (sankashti chaturthi 2023 Date)

पंचांगानुसार सोमवारी  8 मे 2023 ला संध्याकाळी 6.18 वाजता सुरू होणार असून मंगळवारी 9 मे 2023 ला सायंकाळी 4:08 वाजता संपणार आहे. उदय तिथीनुसार सोमवारी 8 मे 2023 ला  संकष्टीचा उपवास करायचा आहे.  

विशेष योग (sankashti chaturthi 2023 muhurat)

संकष्टी चतुर्थीला शिवयोगही जुळून आला आहे. त्यामुळे या दिवशी गणरायासोबत भगवान शंकराची पूजा केली जाणार आहे. 

अभिजीत मुहूर्त – सकाळी 11.51 ते दुपारी 12.45 पर्यंत
गणेशजींची पूजा - संध्याकाळी 05.02 वाजेपासून रात्री  08.02 वाजेपर्यंत 
ज्येष्ठ नक्षत्र -8 मे रोजी सूर्योदयापासून रात्री 7.19 पर्यंत
शिवयोग - 08 मे 2023 दुपारी 02.53 वाजेपासून 09 मे 2023 दुपारी 12.10 वाजेपर्यंत 

संकष्टी चतुर्थी 2023 पूजा विधी (sankashti chaturthi 2023 Puja Vidhi)

या दिवशी लवकर उठून ब्रह्म मुहूर्तावर आंघोळ करा. 
स्वच्छ कपडे घ्याला आणि उपवासाचा संकल्प करा.
मंदिरातील गणेशाची पूजा करा.
फुलं, हार, दुर्वा, सिंदूर, अक्षता अपर्ण करा. 
मोदक आणि बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवा. 
गणेश आरती, कथा आणि मंत्रोच्चार करा. 
संध्याकाळी चंद्राला अर्घ्य अर्पण करुन उपवास सोडा. 

हेसुद्धा वाचा - Budhaditya Yoga 2023 : ग्रहांचा 'राजा' सूर्य आणि 'राजकुमार' बुध यांचं गोचर, 'या' 5 राशींवर महिनाभर पैशांचा पाऊस

तुमच्या शहरात कधी होणार चंद्रोदया? (sankashti chaturthi 2023 Moon time)

मुंबई - रात्री 09.56 वाजता

पुणे - रात्री 09.51 वाजता

नागपूर - रात्री 09.35 वाजता

हेसुद्धा वाचा - Weekly Money Horoscope : 'या' राशींना होईल धनलाभासोबत यशस्वीतेचे शुभ योग

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)