Shani Amavasya 2023/ Sarva Pitru Amavasya 2023 / Surya Grahan 2023 : सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण हे खगोलशास्त्रीय घटना असल्या तरी वैदिक ज्योतिषशास्त्रात या अतिशय अन्यन साधारण महत्त्व आहे. या वर्षांतील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण हे अतिशय खास असून या दिवशी अतिशय दुर्मिळ असा योगायोग जुळून आला आहे. या दिवशी सर्वपित्री अमावस्यासोबत शनिश्चरी अमावस्या आणि सूर्यग्रहण असणार आहे. जी अमावस्या शनिवारी येते तिला शनिश्चर अमावस्या असं म्हणतात. या वर्षातील ही शेवटची शनि अमावस्या आहे. शनिदेवामुळे ज्या जाचकांवर शनिची साडेसाती, धैय्या चालू आहे. त्यांनी या दिवशी पिंडदान, पिंपळाच्या झाडाची पूजा, दान आणि तर्पण नक्की करावं. यामुळे शनिदेच्या प्रकोपापासून आराम मिळतो. शनि महादशाचे अशुभ प्रभाव नाहीसा होता. (Shani Amavasya 2023 and Sarva Pitru Amavasya 2023 and Solar Eclipse 2023 14 october these zodiac people rain of money)
पंचांगानुसार 13 ऑक्टोबर 2023 ला रात्री 09:50 वाजता शनिश्चर अमावस्या सुरु होणार असून दुसऱ्या दिवशी 14 ऑक्टोबर 2023 ला रात्री 11:24 वाजेपर्यंत असणार आहे.
सकाळचा मूहुर्त - सकाळी 07.47 वाजेपासून दुपारी 12.14 वाजेपर्यंत
ब्रह्म मुहूर्त - पहाटे 04.41 वाजेपासून - सकाळी 05.31 वाजेपर्यंत
अमृत काल - सकाळी 09.51 ते सकाळी 11.35 वाजेपर्यंत
सर्वपित्री अमावस्या, शनि अमावस्येलाच सूर्यग्रहण आल्यामुळे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींसाठी फलदायी ठरणार आहे. शनिदेव आणि सूर्यदेवाची विशेष कृपा या राशींच्या लोकांवर बरसणार असल्याने या लोकांना धनलाभाचे योग आहेत.
राशीच्या लोकांवर सूर्यग्रहण आणि शनि अमावस्या लाभदायक ठरणार आहे. ग्रहणकाळात सूर्य कन्या राशीत असल्यामुळे सिंह राशीच्या लोकांना भरपूर लाभ होणार आहे. या लोकांना नशिबाची साथ मिळणार आहे. तुमच्या जबाबदारीत वाढ होणार आहे. करिअर-केंद्रित व्यक्ती त्यांच्या नोकऱ्यांमध्ये प्रगती होणार आहे. व्यावसायिक लोक फायदेशीर सौदे घेऊन आला आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर हा विशेष आशीर्वादाचा महिना असणार आहे. सूर्य आणि चंद्र ग्रहण त्यांच्यासाठी अनुकूल असणार आहे. नशिबाच्या जुळवाजुळवामुळे विविध क्षेत्रांतील कामांना गती मिळणार आहे. व्यावसायिक उपक्रम उत्कृष्ट होणार आहे. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक असणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी दोन्ही ग्रहण अत्यंत फलदायी असणार आहे. यामुळे त्यांना चांगले नशिबाची साथ मिळणार आहे. आर्थिक लाभाच्या संधी क्षितिजावर असणार आहे. करिअर किंवा व्यवसायात प्रगती होणार आहे. या काळात प्रतिष्ठा आणि कामात लक्षणीय प्रगती होणार आहे. अचानक तुम्हाला धनलाभ होणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.