Shani Vakri 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाला कर्माचा न्यायाधीश आणि दाता मानलं जातं. शनिदेव व्यक्तीच्या कर्मानुसार त्याला सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येतात. शनी वक्री ही काही राशींसाठी शुभ तर काही राशींसाठी अतिशय अशुभ असते. 9 ग्रहांपैकी शनी हा सर्वात संथ गतीने आपली स्थिती बदल असतो. शनी वक्री 4 नोव्हेंबर दुपारी 12.30 वाजता होणार आहे. या काळात काही राशींवर साडेसाती आणि धैय्याचा विपरीत परिणाम दिसणार आहे. (shani vakri 2023 challenging time of sade sati and dhaiya these 5 zodiac signs Shani Mantra Shani Vakri Upay)
साडेसातीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात कुंभ आणि मकर राशीवर परिणाम होणार आहे. याकाळात त्यांचं मोठ नुकसान होणार आहे. आर्थिक स्थिती बिघडणार आहे. आरोग्याच्या समस्या उद्भवणार आहे.
तर शनीधैय्याचा परिणामाबद्दल बोलायचं झालं तर कर्क, वृश्चिक या राशींवर होणार आहे. कर्क राशीच्या आठव्या घरात तर वृश्चिक राशीच्या चौथ्या घरात शनिदेव विराजमान असणार आहे. या लोकांना अधिक सावध राहावं लागणार आहे. या राशीच्या लोकांनी आईच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी.
वैदिक ज्योतिषशास्त्राने शनि वक्रीच्या वेळी साडेसाती किंवा धैय्या टाळण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. शनीची साडेसाती आणि धैय्याचा त्रास कमी करण्यासाठी कुंभ, कर्क, वृश्चिक आणि मकर राशीच्या लोकांनी शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. शनिवारी पिंपळाच्या खालीदेखील मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. शनी मंदिरात शनि चालिसाचं पठण करावं. मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरीदेखील शनी चालिसाचं पठण केलं तरी चालेल. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी दान करा.
शनिमंत्राचाही खूप फायदा होतो. त्यामुळे खालील मंत्राच्या तुम्ही जाप करु शकतो.
1. बीज मंत्र-
ॐ शं शनैश्चराय नम:
2. शनि का वेदोक्त मंत्र-
ॐ शमाग्निभि: करच्छन्न: स्तपंत सूर्य शंवातोवा त्वरपा अपास्निधा:
3. श्री शनि व्यासविरचित मंत्र-
ॐ नीलांजन समाभासम्। रविपुत्रम यमाग्रजम्।
छाया मार्तण्डसंभूतम। तम् नमामि शनैश्चरम्।।
4. शनिचर पुराणोक्त मंत्र-
सूर्यपुत्रो दीर्घेदेही विशालाक्ष: शिवप्रिय: द
मंदचार प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनि:
5. शनि स्तोत्र-
नमस्ते कोणसंस्थाचं पिंगलाय नमो एक स्तुते
नमस्ते बभ्रूरूपाय कृष्णाय च नमो ए स्तुत
नमस्ते रौद्रदेहाय नमस्ते चांतकाय च
नमस्ते यमसंज्ञाय नमस्ते सौरये विभो
नमस्ते मंदसज्ञाय शनैश्चर नमो ए स्तुते
प्रसाद कुरू देवेश दिनस्य प्रणतस्य च
कोषस्थह्म पिंगलो बभ्रूकृष्णौ रौदोए न्तको यम:
सौरी शनैश्चरो मंद: पिप्लदेन संस्तुत:
एतानि दश नामामी प्रातरुत्थाय ए पठेत्
शनैश्चरकृता पीडा न कदचित् भविष्यति
6. तंत्रोक्त मंत्र -
ॐ प्रां. प्रीं. प्रौ. स: शनैश्चराय नम:।