Shukra Asta 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रहांमुळे आणि त्याचा ठराविक वेळेनंतर बदलणाऱ्या स्थितीमुळे जाचकाच्या आयुष्यावर परिणाम होतो. जुलै महिन्याच्या एक तारखेला मंगळ गोचर (Mangal Gochar 2023) झालं होतं. आता 7 जुलै 2023 ला शुक्र ग्रह (Shukra Gochar 2023) कर्क राशीत प्रवेश (Venus Transit 2023) करणार आहे. त्यामुळे मंगळ आणि शुक्र ग्रहाचं (Mangal Shukra Yuti) मिलन होणार आहे. धनाचा कारक शुक्र गोचरमुळे काही राशीच्या आयुष्यात पैसाच पैसा येणार आहे. पण बरोबर आजपासून एक महिन्यांनी शुक्र ग्रह अस्त होणार आहे. 4 ऑगस्ट 2023 पासून 3 राशीच्या लोकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागणार आहे. (Shukra Gochar 2023 and Shukra Asta 2023 venus will set in leo 4 zodiac sign will be careful astrology news)
शुक्र गोचर झाल्यानंतर शुक्र अस्तचा सिंह राशीच्या लोकांना नुकसान होणार आहे. या राशीचा स्वामी हा शुक्र असून तो तिसऱ्या आणि दहाव्या घरात आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना आरोग्याच्या समस्या उद्भवणार आहे. त्याशिवाय जोडीदारासोबत वाद होणार असून वैवाहिक जीवनात कहल निर्माण होणार आहे. या काळात नातेसंबंधांमध्येही मतभेद होणार असून वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रातही सहकाऱ्यांचं सहकार्य लाभणार नसल्याने अडचणी वाढणार आहे.
कर्क राशीच्या चतुर्थ आणि एकादश भावाचा स्वामी हा शुक्र असल्याने कर्क राशीच्या लोकांना अधिक त्रास सहन करावा लागणार आहे. कारण शुक्र अस्त देखील कर्क राशीत होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना खूप सावधान राहवं लागणार आहे. या दिवसांमध्ये तुम्हाला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. तुम्हाला कोणाला उधार दिलं असेल तर ते पैसे विसरुन जा, ते तुम्हाला परत मिळणार नाही आहेत. या काळात बोलण्यावर संयम ठेवा नाही तर अनेक अडचणी तुम्ही ओढवून घ्याल. घरातील ज्येष्ठ व्यक्तीची प्रकृती बिघडू शकते. या काळात कुठलाही आर्थिक व्यवहार करु नका.
मीन राशीच्या सहाव्या स्थानात शुक्र ग्रह अस्त होणार आहे. मीन राशीचं हे घर आरोग्य, शत्रू आणि अपघाताशी जोडलेलं आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना अतिशय सावध राहावं लागणार आहे. या दिवसांमध्ये त्यांना आरोग्याची समस्या, शत्रूकडून जाच तर दुर्घटनेला समोरं जावं लागण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रातील गुप्त शत्रूं अगदी घरातीलही शत्रू तुमच्याविरोधात कटकारस्थान रचणार आहेत. या प्रवासात कुठलाही प्रवास करु नका. अगदी वाहन देखील या काळात जपून चालवा. या काळात तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. संकट चोहूबाजूने येणार आहे. शनीची साडेसाती आणि शुक्र अस्तमुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होणार आहे.