Shukra Gochar February 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी असून त्याचं वैशिष्ट्य देखील आहे. या कालावधीत गोचर कुंडलीतील स्थानावरून ग्रह फळ देत असतो. शुक्र हा ग्रह धन, प्रेम, आकर्षण आणि विवाहाचा कारक ग्रह आहे. शुक्र ग्रह एका राशीत 23 दिवस राहतो. त्यामुळे या कालावधीत शुक्राची स्थिती काय आहे? हे महत्त्वाचं ठरतं. शुक्र ग्रह अस्ताला असताना विवाह कार्य करत नाहीत. या काळात झालेली लग्न यशस्वी ठरत नाहीत. त्यामुळे सुखी संसारासाठी शुक्र ग्रहाची कृपा असणं महत्त्वाचं आहे. शुक्र हा भौतिक सुखाचा कारक आहे. सध्या शुक्र ग्रह धनु राशीत असून बुधासोबत असलेल्या युतीमुळे लक्ष्मी नारायण योग तयार झाला आहे. यानंतर शुक्र मकर, कुंभ आणि फेब्रुवारी 2023 मध्ये मीन राशीत गोचर करेल. 15 फेब्रुवारी 2023 रोजी शुक्र आपली उच्च राशी असलेल्या मीन राशीत गोचर करत मालव्य राजयोग तयार करत आहे. या मालव्य राजयोगाचा तीन राशींना जबरदस्त फायदा होणार आहे.
मिथुन- मिथुन राशीसाठी मालव्य राजयोग फायदेशीर ठरणार आहे. या काळात नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यापाऱ्यात करार निश्चित होऊ शकतो. लोकं तुमच्या कामाचं कौतुक करतील. तसेच प्रमोशन-इंक्रीमेंट मिळण्याची शक्यता आहे. अविवाहीत लोकांना विवाहाचा प्रबळ योग आहे. तसेच कौटुंबिक कलह या काळात दूर होतील.
कन्या- या राशीसाठी मालव्य राजयोग फलदायी ठरेल. लव्ह आणि मॅरेज लाईफमध्ये चांगले बदल दिसून येतील. या काळात अविवाहितांची लग्न जुळतील. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूळ असणार आह. या काळात विदेशात जाण्याचा योग आहे. या काळात आनंदी जीवन जगण्याचा अनुभव येईल. फॅमिली आणि प्रोफेशनल लाईफमध्ये चांगला अनुभव मिळेल.
बातमी वाचा- Surya Gochar: 16 डिसेंबरला धनु संक्रांती, या दिवशी उपाय केल्याने मिळणार सूर्य बळ
धनु- शुक्रच्या गोचरामुळे मालव्य राजयोग या राशीसाठी अच्छे दिन घेऊन येईल. शुक्राच्या आशीर्वादामुळे सुख समृद्धी अनुभवास येईल. नवीन घर किंवा गाडी खरेदी करण्याचा योग जुळून येईल. तसेच प्रॉपर्टी करण्यास अनुकूल काळ आहे. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. तसेच प्रमोशन आणि इंक्रीमेंटचा योग आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)