Surya Grahan 2023 Effect : ऑक्टोबर महिन्यात दोन ग्रहण येणार आहे. या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण ऑक्टोबर महिन्यात असणार आहे. सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना असली तरी याला ज्योतिषशास्त्रातही अतिशय महत्त्व आहे. ग्रहणाला नकारात्मक ऊर्जा आणि अशुभ मानले जाते. धार्मिकदृष्ट्या ग्रहण काळात मंदिरांचे दरवाजे बंद ठेवले जातात. कारण शास्त्रात ग्रहण काळात पूजा आणि शुभ कार्य वर्ज असतं. या वर्षातील तिसरं ग्रहण आणि वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण येत्या 14 ऑक्टोबर 2023 ला असणार आहे. यादिवशी सर्वपित्री अमावस्या आहे. वर्षातील दुसरं सूर्यग्रहण हे भारतात दिसणार नाही आहे. तरी सूर्यग्रहण सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी कन्या राशीत होणार असून या दिवशी चित्रा नक्षत्र आहे. त्यामुळे हे सूर्यग्रहण काही राशींसाठी डोकेदुखी ठरणार आहे. यात तुमची रास आहे का जाणून घ्या. (Solar Eclipse 2023 surya grahan 2023 and sarvapitri amavasya 14 october these zodiac people should be alert)
वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण हे मेष राशीच्या लोकांसाठी कठीण काळ घेऊन येणार आहे. या लोकांच्या आयुष्यात एकाच वेळी अनेक समस्या निर्माण होणार आहेत. या लोकांना आर्थिक फटका बसणार आहे. तुमचं मोठं नुकसान होणार आहे. तुमच्या करिअरमध्ये अडचणी येणार आहेत.
वर्षातील दुसरे सूर्यग्रहण सिंह राशीच्या लोकांसाठी अशुभ असणार आहे. या लोकांच्या आयुष्यात अनेक संकट येणार असून तुम्ही अनेक चढ उतार पाहणार आहात. समाजात तुमचा सन्मानाला धक्का बसणार आहे. तुमच्या बँक बॅलेन्स ढासळणार आहे. खर्च दिवसेंदिवस वाढणार आहे. त्याशिवाय तुमच्या मौल्यवान वस्तू काळात सांभाळून ठेवा.
सूर्यग्रहण कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक संकट येणार आहे. त्यासोबत तुम्हाला अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागणार आहे. सूर्यग्रहण काळात तुमच्या आयुष्यात तणाव वाढणार आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. या दिवसांमध्ये तुमचा आत्मविश्वास ढासळणार आहे.
तूळ राशीच्या लोकांवर सूर्यग्रहणाचा अशुभ परिणाम होणार आहे. या काळात तुमची मानसिक स्थिती खराब होणार आहे. मानसिक समस्यांमुळे तुमची चिडचिड होणार आहे. तुमच्या या काळात एखाद्यासोबत वाद होण्याची भीती आहे. या काळात तुमच्या वाणीवर आणि आक्रमकतेपणावर नियंत्रण ठेवा. अन्यथा तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)