Somvati Amavasya 2024 : सोमवती अमावस्या शुभ संयोग! 'या' राशींचे लोक होणार मालामाल

Somvati Amavasya 2024 : सोमवती अमावस्येला ज्येष्ठ नक्षत्रसोबत वृद्धी योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. या शुभ संयोगाचा फायदा 5 राशींच्या लोकांना होणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jan 8, 2024, 12:10 AM IST
Somvati Amavasya 2024 : सोमवती अमावस्या शुभ संयोग! 'या' राशींचे लोक होणार मालामाल title=
Somvati Amavasyac 2024 auspicious conjunction this zodiac sign will be wealth

Somvati Amavasya 2024 :  सोमवार हा चंद्र देव आणि महादेव यांना समर्पित दिवस आहे. या वर्षातील पहिली अमावस्या ही सोमवारी आल्यामुळे तिला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, वृद्धी योग, आदित्य मंगल योग आणि अनुराधा नक्षत्रासह बुधादित्य राजयोग आहे. त्यामुळे अशा शुभ योगाचा फायदा 5 राशींच्या लोकांना होणार आहे. (Somvati Amavasyac 2024 auspicious conjunction this zodiac sign will be wealth)

वृषभ रास (Taurus Zodiac) 

वृषभ राशीच्या लोकांसाठी सोमवती अमावस्या लाभदायक ठरणार आहे. या लोकांना चांगली बातमी मिळणार आहे. धार्मिक कार्यात रस वाढणार आहे. नोकरदार लोकांना आठवड्याच्या पहिल्या दिवशी नवीन जबाबदाऱ्या देण्यात येणार आहे. व्यावसायिकांना चांगले पैसे कमविण्याची संधी मिळणार आहे. ज्यामुळे त्यांच्या व्यवसायाची विश्वासार्हता द्विगुणीत वाढ होणार आहे. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनाबद्दल आनंद आणि परस्पर संबंध घट्ट करणारा ठरणार आहे. 

सिंह रास (Leo Zodiac) 

या राशीच्या लोकांना भगवान शंकराचा अपार आशीर्वाद लाभणार आहे. तुमची अपूर्ण कामं पूर्ण होणार आहेत. जीवनात प्रगतीच्या नवीन कल्पना तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. तुमची प्रतिकारशक्ती वाढणार आहे. तुमचं आरोग्य सुधारणार आहे. जोडीदारासोबत रोमँटिक डिनरसाठी जाणार आहात. तुमचे नातेसंबंध मजबूत होणार आहे. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी सोमवती अमावस्या शुभ ठरणार आहे. 

तूळ रास (Libra Zodiac)  

तूळ राशीच्या लोकांना नशीब साथ मिळणार आहे. ज्यामुळे तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होणार आहे. पैसे कमावण्याच्या नवीन कल्पना देखील तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती असणार आहे. पालकांना आपल्या मुलांची प्रगती पाहून आनंद मिळणार आहे. धनवृद्धीमुळे आर्थिक स्थिती सुधारणार आहे. 

धनु रास (Sagittarius Zodiac) 

धनु राशीच्या लोकांची अपूर्ण कामं पूर्ण होणार आहे. सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी तुमचा उत्साह वाढणार आहे. जिद्दीने काम पूर्ण कराल तर त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. तुमच्या आत्मविश्वासाला चांगली चालना मिळणार आहे. तुम्ही तुमचं काम आनंदाने पूर्ण करणार आहात. नवीन नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला काही लोक मदत करणार आहात. 

कुंभ रास (Aquarius Zodiac) 

कुंभ राशीच्या लोकांचं वर्तन शांत आणि मिलनसार असल्याने कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. व्यवसायिकांना चांगला आर्थिक लाभ होणार आहे. तुम्ही केलेली गुंतवणूक फलदायी ठरणार आहे. महादेवाच्या कृपेने तुमची आर्थिक लाभाची इच्छा पूर्ण होणार आहे. तुम्ही बचत करण्यात यशस्वी होणार आहे. कुटुंबातील सदस्यांशी संबंध चांगले होणार आहेत. घरातील वातावरण आनंदी असणार आहे. याशिवाय कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरीही मिळण्याची शक्यता आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)