close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आजचे राशीभविष्य | बुधवार | २६ जून २०१९

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस   

Updated: Jun 26, 2019, 09:14 AM IST
आजचे राशीभविष्य | बुधवार | २६ जून २०१९

मेष- बेरोजगारांसाठी दिवस चांगला आहे. करियरमध्ये पुढे जाण्याचे मार्ग खुले होतील. आत्मविश्वास वाढेल. व्यापाराकडे विशेष लक्ष द्या. सामाजीक संबंध वाढण्याचे योग आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. खर्च वाढण्याची शक्यता आहे.
 
वृषभ- ऑफिसमध्ये कामकाज जास्त असेल. काही लोक तुमच्याकडून काम करून घेण्याचा प्रयत्न करतील. जास्त विचार करू नका. साथीदारापासून काहीही लपवू नका.

मिथुन- व्यावसाय आणि नोकरीमध्ये कुटुंबाची मदत मिळेल. कामाच्याठिकाणी विचार करून बोला. विचार सकारात्मक ठेवा. विश्वासातील लोकांकडून मदत मिळेल. आरोग्याकडे विशोष लक्ष द्या

कर्क- मेहनतीचे फळ मिळेल. इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रमोशन मिळण्याची शक्याता आहे. कोणत्याही प्रकारची संधी गमावू नका. लोकांकडून कामे करून घेण्यास यश मिळेल. नवीन कामास प्रारंभ केल्यास इतरांकडून मदत मिळेल. दिवस चांगला आहे. आरोग्य सामान्य राहिल. 

सिंह-कुटुंबाकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. तुमची मानसिक स्थिती संतुलित राहिल. काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. करियर आणि गुंतवणूकीत खास संधी मिळण्याची शक्यता आहे. पैसा आणि कुटुंबाकडे पूर्ण लक्ष राहिल. आरोग्यात सुधार होऊ शकतात. 

कन्या- आत्मविश्वास वाढेल. आज तुम्ही इतरांना प्रभावीत कराल. तुमचे विचार करण्याचे मार्ग लोकांना आकर्षित करतील. तुम्ही दिलेल्या सल्ल्याचा फायदा लोकांना होण्याची शक्यता आहे. चांगल्या बातमीची प्रतिक्षा असेल. खाजगी आयुष्यासाठी दिवस सामान्य राहिल. गुडघ्यांच्या आजारांनी त्रस्त राहाल.

तुळ- कामाच्या ठिकाणी मनमिळावू वातावरण नसल्याने मन नाराज राहिल. खाजगी आयुष्यात अडचणी निर्माण होतील. रोजच्या वाढत्या कामांमुळे समस्या वाढतील. कोणावरही आधारीत राहू नका. आरोग्याच्या बाबतीत काही समस्या उद्भवतील.

वृश्चिक- विचार केलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या विचार शक्तीत सकारात्मकता जाणवेल. मुलांकडून सहकार्य मिळेल. आखलेले बेत मेहनतीने पूर्ण करा. त्याचे फळ नक्कीच मिळेल. अडकलेले पैसे पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. चांगल्या संधी मिळू शकतात.
  
धनू- व्यापारात अचानक धन लाभ होईल. साथीदाराकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. साथीदाराचे सल्ले महत्वपूर्ण ठरू शकतात. अडकलेले पैसे पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. काही चांगल्या संधी मिळू शकतात. गोड बोलूण काम  करूण घ्याल. आरोग्याच्या बाबतीत काही समस्या उद्भवतील. आहाराकडे विशेष लक्ष द्या. 

मकर- विचार केलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या विचार शक्तीत सकारात्मकता जाणवेल. मुलांकडून सहकार्य मिळेल. आखलेले बेत मेहनतीने पूर्ण करा. त्याचे फळ नक्कीच मिळेल. अडकलेले पैसे पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. चांगल्या संधी मिळू शकतात. 

कुंभ- व्यावसाय करणाऱ्यांसाठी दिवस मध्यम स्वरूपाचा आहे. कोणाला पैसे उधार  देऊ नका. जूने केलेले व्यवहार तणावास कारणीभूत ठरतील. नोकरी करणाऱ्यांनी सावध राहा. ऑफिस मध्ये अडचणींचा सामना करावा लागेल. काही कारणांमुळे तणाव येईल. मानसिक तणाव वाढेल. 

मीन- प्रयत्न केल्यास यशस्वी व्हाल. आज कोणा एका व्यक्तीला तुमच्या मनीची गोष्ट पटवून सांगण्यात यशस्वी ठराल. एकांतात काही वेळ व्यतीत करा, फायद्याचं ठरेल. कामाच्या ठिकाणी काही गोष्टींमध्ये तडजोड करावी लागेल.
डॉ. दीपक शुक्ल