३ फेब्रुवारी : 'या' व्यक्तींनी महत्त्वाचे निर्णय घेवू नका

आजचा दिवस कसा असेल    

Updated: Feb 3, 2020, 08:13 AM IST
३ फेब्रुवारी : 'या' व्यक्तींनी महत्त्वाचे निर्णय घेवू नका title=

मेष - मित्र परिवाराकडून आणि भावंडांकडून मदत मिळेल. नवीन काम सुरू करण्यासाठी शुभ दिवस आहे. जबाबदाऱ्या योग्य प्रकारे हाताळा. साथीदारासोबत वेळ व्यतीत कराल. आरोग्याकडे लक्ष द्या. 

वृषभ - जुन्या समस्या मार्गी लागतील. स्वत:कडे लक्ष द्या. नवीन कल्पना सुचतील. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ ठेवावा लागेल. मित्रांची मदत मिळेल. कामात व्यस्त राहाल. 

मिथुन - नकारात्मक भूमिकेमुळे हाती आलेली संधी गमवाल. आज कोणत्याही प्रकारचा निर्णय हेवू नका. विचार करून आपले मत व्यक्त करा. इतरांचा तुमच्यावर दबाव येऊ देऊ नका. 

कर्क - नव्या कामात अडचणी येण्याची शक्यता  आहे. अडचणींवर मात करण्यासाठी दिवस योग्य आहे. नवीन संधी मिळण्याची संधी आहे. विचार केलेल्या कामांना सुरूवात करा. कामं लवकर पूर्ण होतील. वैयक्तिक आयुष्यातील अडचणी कमी होतील. 

सिंह - विचार केलेली कामे पूर्ण होणार नाहीत. विचारांची घोडदौड डोक्यात सुरू राहिल. पैसे सांभाळून वापरा. गुंतवणुक विचारपूर्वक करा. आरोग्याकडे लक्ष द्या. 

कन्या - मनात सतत दुहेरी विचार सुरु असल्याने कामात मन लागणार नाही. महत्त्वाचा निर्णय घेणं कठीण होईल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. चिंता राहील. वाद-विवादापासून दूर राहा. कामात एकाग्रता नसेल. वायफळ अधिक खर्च होऊ शकतो. मानसिक ताण राहील. अधिक विचार न करणं योग्य ठरेल.

तुळ - दिवस चांगला आहे. धनलाभ होऊ शकतो. परिस्थितीचा योग्य फायदा घ्या. कामकाजात मन रमेल. चांगली संधी मिळेल. दुसऱ्यांना नाराज न करता चतुराईने काम कराल. जोडीदाराकडून खास प्रेम आणि भेट मिळेल. आरोग्य चांगले राहिल. 

वृश्चिक - तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल होऊ शकतो. कामात लक्ष लागणार नाही. कामात कन्फ्यूजन वाढेल. जोडीदारासोबत वाद होऊ शकतात. तुमच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतात. काही जण तुमच्या कामाचं क्रेडिट घेण्याचं प्रयत्न करतील. तुमची स्थिती जाहीरपणे बोलवून दाखवू नका.

धनु  - आर्थीक अडचणी सुटतील. वैवाहिक जीनव आनंदी असेल. रोजच्या कामामुळे धनलाभ होऊ शकतो. मोठी अडचण दूर होईल. मुलांकडून मदत मिळेल. नवीन लोकांसोबत भेटी होतील. आरोग्याकडे लक्ष द्या. 

मकर - दिवस चांगला असेल. विचार करुन मगच पुढे जा. वायफळ खर्च होऊ शकतो. मनातील सर्वच गोष्टी सर्वांशी शेअर करु नका. रखडलेली काम पूर्ण करा, नवीन कामाची सुरुवात करणं टाळा.

कुंभ - कामाच्या ठिकाणी स्वत:वर नियंत्रण ठेवा. बढतीचे योग आहेत. नोकरी आणि व्यवसायासंबंधीत महत्त्वाचे निर्णय घेवू नका. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. 

मीन - नोकरीमध्ये उत्तम कामगिरी राहिल. बिझनेसमध्ये फायदा होण्याचा योग आहे. वरिष्ठांकडून मदत मिळेल. मुलाखत देण्याचा विचार असेल तर यश मिळेल. आज मन प्रसन्न राहिल.