Sun Transit August 2022 Effect: ज्योतिषशास्त्रातील ग्रहांचे बदल आणि त्याचे परिणाम सामान्य जातकांना विचार करण्यास भाग पाडतात. प्रत्येक ग्रहाचा गोचर त्या राशीतील स्थानाप्रमाणे फळ देत असतात. त्यामुळे काही राशींना शुभ, तर राशींना अशुभ परिणाम मिळतात. नऊ ग्रहांचा भ्रमण कालावधी ठरलेला आहे. चंद्र ग्रह दर सव्वा दोन दिवसांनी, तर न्यायदेवता शनि ग्रह अडीच वर्षानंतर राशी बदल करतो. त्यामुळे भ्रमण कालावधीत एकापेक्षा जास्त ग्रह एका राशीत येण्याची शक्यता असते. त्यामुळे काही शुभ-अशुभ योग तयार होतात.
गोचर कुंडलीत ग्रहांचा राजा सूर्यदेव 30 दिवसांनी राशी बदल करतो. सूर्य ग्रहाच्या एखाद्या राशीतील प्रवेशाला संक्रांती संबोधलं जातं. जसं की मकर राशीत प्रवेश केला की, मकर संक्राती. आता सूर्यदेव 15 दिवसांनी म्हणजेच 17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7 वाजून 27 मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य ग्रहाचा हा राशीबदल काही राशींसाठी शुभ सिद्ध होणार आहे.
कर्क- सूर्य सध्या कर्क राशीत असून 17 ऑगस्टनंतर कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल. कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्याचा सिंह राशीत प्रवेश शुभ राहील. या काळात वरिष्ठांशी संबंध सुधारतील आणि अपेक्षित यश मिळेल. नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्या लोकांना चांगली ऑफर मिळेल. तसेच अडकलेले पैसे सहज उपलब्ध होतील.
तूळ- ऑगस्ट महिन्यात सूर्याचं भ्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी चांगले परिणाम देईल. या लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. पैशाचे नवीन मार्गही निर्माण होतील. दुसरीकडे, या राशीच्या व्यापाऱ्यांना सूर्याच्या संक्रमणामुळे जोरदार नफा मिळेल. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला असेल.
वृश्चिक- ऑगस्टचा सूर्य गोचर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चांगली बातमी देईल. विशेषतः करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. नोकरीत पदोन्नतीची इच्छा पूर्ण होईल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांची प्रतीक्षा संपुष्टात येईल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. एकंदरीत हा काळ सर्वच बाबतीत चांगला राहील.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)