Surya Grahan 2023 Zodiac signs Effect in marathi : खगोलशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहण (Chandra Grahan 2023) आणि सूर्यग्रहणाला (Solar Eclipse 2023) विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रात (astrology) ग्रहणाला अन्यन साधारण महत्त्व आहे. त्याबद्दल हिंदू धार्मिकनुसार समज अपसमज आहेत. ग्रहणात अनेक गोष्टी वर्ज्य असतात. ग्रहण हे शुभ नसतं असं, मान्यता आहे. ग्रहणात सुतक काळ पाळला जातो. या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण 30 दिवसांवर येऊन ठेपलं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या सूर्यग्रहणाचा सर्व राशींवर (zodiac signs) परिणाम होणार आहे. कुठल्या राशीसाठी शुभ ठरणार आहे ते जाणून घेऊयात. (Surya Grahan 2023 Effect these zodiac signs will shine like the sunin marathi )
या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण 20 एप्रिल (solar eclipse april) गुरुवारी आहे. हे ग्रहण सकाळी 7.45 पासून सुरु होणार असून ते दुपारी 12.29 पर्यंत असणार आहे.
आशियातील काही देशांसह, ऑस्ट्रेलिया, हिंदी महासागर आणि अंटार्क्टिकामध्ये हे सूर्यग्रहण पाहता येणार आहे.
वर्षातील पहिलं सूर्यग्रहण (first eclipse of year 2023)भारतात दिसणार नाही आहे. त्यामुळे भारतीयांना सुतक काळ पाळण्याची गरज नाही.
वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण हे काही राशींसाठी शुभ ठरणार आहे. मिथुन आणि वृषभ राशीच्या लोकांनाही हे ग्रहण फायदेशीर ठरणार आहे. तर मेष, कन्या आणि सिंह राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण अशुभ असणार आहे. (Astrology Today In marathi)
हे सूर्य ग्रहण या राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभ घेऊन आलं आहे. नोकरीच्या अनेक संधी मिळतील. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमच्या सुख सुविधांमध्ये वाढ होईल.
सूर्यग्रहणामुळे या राशीच्या लोकांना धनलाभ होणार आहे. प्रवासाचे योग आहे. अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. राजकीय क्षेत्रात नाव होईल. कोर्टाचं कुठलं प्रकरण असेल तर मार्गी लागेल. समाजात मान सन्मान वाढले.
या राशीच्या लोकांना सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे नशिबाची तगडी साथ मिळणार आहे. उद्योगपतींना फायदा होणार आहे. नोकरदारांना पदोन्नती आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद राहिल आणि प्रेम वाढेल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)