Surya Grahan 2023 : 2 महिन्यांनंतर लागणार वर्षातील दुसरं सूर्य ग्रहण; 'या' राशींचं होणार नुकसान

ग्रहांच्या हालचालींबद्दल विज्ञान आणि ज्योतिषशास्त्र यांच्यामध्ये भिन्न मते असू शकतात. परंतु अनेक ठिकाणी दोन्हीचा निष्कर्ष सारखाच निघतो. विज्ञानामध्ये जिथे ग्रहण ही केवळ खगोलीय घटना मानली जाते, परंतु वैदिक ज्योतिषशास्त्रात ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानली जाते. 

सुरभि जगदीश | Updated: Jul 7, 2023, 11:59 AM IST
Surya Grahan 2023 : 2 महिन्यांनंतर लागणार वर्षातील दुसरं सूर्य ग्रहण; 'या' राशींचं होणार नुकसान title=

Surya Grahan in 2023 : ग्रहांच्या हालचालींबद्दल विज्ञान आणि ज्योतिषशास्त्र यांच्यामध्ये भिन्न मते असू शकतात. परंतु अनेक ठिकाणी दोन्हीचा निष्कर्ष सारखाच निघतो. विज्ञानामध्ये जिथे ग्रहण ही केवळ खगोलीय घटना मानली जाते, परंतु वैदिक ज्योतिषशास्त्रात ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानली जाते. 

हिंदू धर्मामध्ये सूर्य हा केवळ एक ग्रह मानला जात नाही, तर त्याला भगवान भास्कर आणि राजा म्हणतात. याचं कारण म्हणजे ज्यावेळी सूर्य ग्रहण होतं तेव्हा त्याचा सर्व राशींवर परिणाम होताना दिसतो. 

2023 या वर्षात दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण होणार आहे. दरम्यान त्यापैकी एक सूर्यग्रहण आणि एक चंद्रग्रहण आधीच पूर्ण झालंय. अजून 1 सूर्यग्रहण आणि 1 चंद्रग्रहण होणं बाकी आहे. सूर्यग्रहणाबद्दल बोलायचं तर वर्षातील शेवटचं आणि दुसरे ग्रहण 14 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. 

कंकणाकृती सूर्यग्रहण 

माहितीनुसार, हे ग्रहण कंकणाकृती असणार आहे. यामध्ये सूर्य पूर्णपणे झाकला जाणार नाही. यावेळी सूर्य रिंगच्या आकारात दिसणार आहे. याला विज्ञानात या प्रकारच्या ग्रहणाला रिंग ऑफ फायर म्हटलं जातं. कंकणाकृती सूर्यग्रहणामध्ये चंद्र पृथ्वीपासून दूर असताना पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये येतो. याचाच अर्थ म्हणजेच चंद्र सूर्याला अशा प्रकारे झाकतो की सूर्याचा फक्त मध्य भाग सावलीच्या प्रदेशात येतो. 

भारतात दिसणार का हे ग्रहण?

भारतीय वेळेनुसार, हे सूर्यग्रहण 14 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 8.34 वाजता सुरू होणार आहे. मध्यरात्री 2.25 वाजता हे ग्रहण संपणार आहे. रात्र असल्याने हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे सुतक कालावधी वैध ठरणार नाही. 

या राशींवर होणार परिणाम

तूळ रास

सूर्य ग्रहणाचा वाईट परिणाम तुमच्यावर होण्याची शक्यता असते. या काळात मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. इतरांशी बोलताना वाणीवर संयम ठेवावा लागेल.

मेष रास

या राशींच्या व्यक्तींना सूर्यग्रहणाच्या नकारात्मक प्रभावांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. नोकरी करण्याऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी अडचण येईल. जवळच्या व्यक्तींकडून धोका होऊ शकतो.

कन्या रास

या राशीच्या व्यक्तींना सूर्य ग्रहणाचे शुभ परिणाम मिळणार नाहीत. कोणत्याही वादात सापडून नये. मित्रांशी मतभेद होणार आहे. प्रेयसीला चांगली वागणूक द्या.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )