Surya Nakshatra Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर राशीत बदल करतात. यावेळी ग्रहांच्या राशी बदलण्यासोबतच ते नक्षत्रही बदलतात. नक्षत्र बदलाचा लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. 16 जुलै 2023 रोजी सूर्याने आपले राशी बदलून कर्क राशीत प्रवेश केलाय. तर 3 ऑगस्ट 2023 रोजी सूर्याने नक्षत्र गोचर करून आश्लेषा नक्षत्रात प्रवेश केला आहे.
17 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 1.44 पर्यंत सूर्य आश्लेषा नक्षत्रात राहणार आहे. सूर्याच्या या नक्षत्र गोचरचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होणार आहे. मात्र काही राशींच्या व्यक्तींना याचे चांगले परिणाम मिळू शकणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींना आश्लेषा नक्षत्रात सूर्याच्या गोचरमुळे शुभ परिणाम मिळू शकणार आहेत.
आश्लेषा नक्षत्रात सूर्याचा प्रवेश मेष राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. विशेषत: सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकते. कोणतीही मोठी ऑर्डर मिळू शकते. कुटुंबात काही अडचण असेल तर दूर होऊ शकते. कौटुंबिक वातावरणाच्या दृष्टीने हा काळ चांगला जाणार आहे. एकूणच करिअर आणि वैयक्तिक आयुष्य या दोन्ही बाबतीत हा काळ चांगला राहणार आहे. व्यावसायिकांना फायदा होण्याची दाट शक्यता आहे.
आश्लेषा नक्षत्रातील सूर्याचे गोचर वृषभ राशीच्या राशीच्या लोकांना मोठे यश मिळवून देऊ शकते. पदोन्नतीची आणि वाढीची तुम्ही वाट पाहत असाल ते ते होणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. कठोर परिश्रमात कमतरता येऊ देऊ नका. अडकलेला पैसा तुम्हाला मिळणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. तुमची मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते.
सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांवर सूर्याचा विशेष आशीर्वाद असतो. सूर्याच्या नक्षत्र गोचरचा तुमच्या करिअरसाठी शुभ राहणार आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात वेगाने वाढ होईल. कामात यश मिळेल. तुमचे अडकलेले पैसे मिळू शकतात.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )