Lucky Signs Of Women: भविष्याबाबत वेध घेणाऱ्या अनेक विद्या प्रचलित आहे. ग्रहतारे, अंक याद्वारे भाकीत वर्तवलं जातं. यात प्रामुख्याने ज्योतिष (Astrology), अंकशास्त्र (Numerology), सामुद्रिक शास्त्र (Samudrik Shastra), टॅरो कार्ड (Tarrot Card) असे विविध प्रकार आहेत. सामुद्रिक शास्त्रात शरीरावरील खाणाखुणा, आकार, रंग आणि चिन्हांवरून भाकीत वर्तवलं जातं. काही खुणा नशिबान व्यक्तींच्या शरीरावर असतात. अशाच काही खुणा महिलांच्या शरीरावर असल्यास त्यांना भाग्यवान समजलं जातं. ज्या महिलांच्या पायावरील शुभ चिन्हांवरून हा अंदाज बांधला जातो. या शुभ चिन्हांमुळे पती आणि सासरच्या लोकांचं भलं होतं.
- ज्या महिलांच्या पायाच्या तळव्यावर शंख, कमळ, चक्राचे चिन्ह असते, त्या महिला खूप भाग्यवान असतात. अशा महिलांच्या आयुष्यात कधीही कशाचीही कमतरता नसते. भविष्यात त्या अफाट संपत्तीच्या मालक होतात. यासोबतच कुटुंबासाठी खूप भाग्यवान ठरतात.
- ज्या महिलांचे पाय मऊ, गुळगुळीत आणि लालसर असतात. त्यांच्यावर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते. गरीब घरात जन्माला आले किंवा गरीब घरात लग्न झाले तरी घरची आर्थिक स्थिती लवकरच बदलते. अशा महिला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतात.
बातमी वाचा- Putrada Ekadashi 2023: नव्या वर्षाच्या सुरुवातीला पुत्रदा एकादशी, जाणून घ्या पूजा विधी आणि शुभ मुहूर्त
- ज्या महिलांची बोटे रुंद, गोलाकार आणि किंचित लाल असतात, अशा महिलांना समुद्रिकशास्त्रात खूप भाग्यवान मानले जाते. त्या आपल्या पतीचे नशीबही उजळवतात. यासोबतच लग्न झाल्यानंतर ज्या घरात जातात त्या घरात नेहमी सुख-समृद्धी असते.
- ज्या महिलांची टाच आणि पंजे वर असतात आणि पायाचा मधला भाग दाबलेला असतो, अशा महिलांवर देवी लक्ष्मीची कृपा असते. अशा स्त्रिया आपल्या पती आणि सासरच्या लोकांना प्रत्येक परिस्थितीत साथ देतात. अशा महिलांनी व्यवसायात पतीची साथ दिली तर त्यांची प्रगती झटपट होते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)