Rajyog: 13 वर्षांनंतर दिवाळीत एकत्रित बनणार 3 खास राजयोग; 'या' राशींच्या व्यक्ती होणार मालामाल

Shash, Amrit and Mahalakshmi Yoga: शनी स्वग्रही असल्यामुळे 11व्या भावात शश योग निर्माण होत आहे. मंगळ आणि चंद्राच्या संयोगाने महालक्ष्मी योग निर्माण होताना दिसतोय. सूर्य मंगळासोबत अमृत योग तयार करत आहे. हे राजयोग फार दुर्मिळ आहेत.

सुरभि जगदीश | Updated: Nov 7, 2023, 08:20 AM IST
Rajyog: 13 वर्षांनंतर दिवाळीत एकत्रित बनणार 3 खास राजयोग; 'या' राशींच्या व्यक्ती होणार मालामाल title=

Shash, Amrit and Mahalakshmi Yoga: हिंदू सणांच्या दिवशी देव देवतांची पुजा केली जाते. दिवाळी आता तोंडावर आली असून दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी आणि धनाची देवी गणेशाची पूजा केली जाते. यावर्षी दिवाळीत राजयोग आहे. 12 नोव्हेंबरला गुरू मेष राशीत गोचर करतोय. हे 13 वर्षांनंतर होणार आहे. 

शनी स्वग्रही असल्यामुळे 11व्या भावात शश योग निर्माण होत आहे. मंगळ आणि चंद्राच्या संयोगाने महालक्ष्मी योग निर्माण होताना दिसतोय. सूर्य मंगळासोबत अमृत योग तयार करत आहे. हे राजयोग फार दुर्मिळ आहेत. या 3 राजयोगांमुळे काही राशींच्या लोकांना लाभ मिळणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. कमाईसोबतच तुम्हाला अधिक नफाही मिळणार आहे. 11व्या घरात गुरु, 10व्या घरात राहू आणि भाग्याच्या घरात शनी असल्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना सर्वाधिक फायदा होणार आहे. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर अशा वेळी असे करणे फायदेशीर ठरू शकते. जीवनात संपत्ती मिळण्याची आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची पूर्ण शक्यता आहे.

तूळ रास 

जर चंद्र तूळ राशीमध्ये मंगळाच्या बरोबर असल्याने इतर राशीच्या तुलनेत निश्चितच जास्त फायदा होईल. यामुळे प्रयत्न चांगले असल्याने यश मिळवू शकतात. या काळात व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. नोकरीमध्ये पगार वाढण्याची आणि नवीन नोकरीच्या संधी मिळण्याची संधी मिळेल. व्यवसायात भरपूर फायदा होऊ शकतो.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी तृतीय स्थानात राहू, धनस्थानात शनि, चतुर्थ स्थानात गुरु आणि दशम स्थानात चंद्र असल्यामुळे मकर राशीच्या लोकांना मिथुन नंतर सर्वाधिक लाभ होणार आहेत. या राशीच्या लोकांना संपत्तीचा लाभ होईल. या काळात नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोक यश मिळवू शकतात. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होणार आहेत. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )