close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आजचे राशीभविष्य | शुक्रवार | १९ जुलै २०१९

जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस 

Updated: Jul 19, 2019, 08:38 AM IST
आजचे राशीभविष्य | शुक्रवार | १९ जुलै २०१९

मेष- कामाच्या व्यापासोबतच जबाबदारी वाढेल. दिवसभर व्यग्र असाल. व्यवसायातील काही गोष्टी समजूतदारपणे सोडवाल. अनेक अंशी यशस्वी ठराल. नोकरीच्या ठिकाणी वातावरण शांत असेल. प्रवासाचा बेत आखाल. अडचणींना तोंड देण्याचाही एखादा बेत आखाल. 

वृषभ- जुन्या अडचणी दूर होतील. स्वत:वर लक्ष द्या. नव्या कपड्यांची खरेदी कराल. दिवसभर सक्रिय असाल. यशस्वी व्हाल पण, धीर ठेवा. मित्रांची मदत मिळेल. 

मिथुन- धनलाभ होण्याची शक्यता आहे. अशा एखाद्या कामाचा फायदा होण्याची. अनेक प्रकारच्या योजना आखण्यची शक्यता आहे. अविवाहितांसाठी विवाहप्रस्ताव येण्याची शक्यता आहे. बुद्धीचातुर्याने अनेक कामं पूर्ण कराल. एखादी शुभवार्ता कळेल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. 

कर्क- अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे मिळतील. अनेक अडचणींचा सामना करण्यासाठी मित्रांची मदत होईल. एखाद्या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न कराल. 

सिंह- आर्थिक परिस्थितीत काही महत्त्वाचे बदल घडू शकतात. महत्त्वाकांक्षा वाढलेली असेल. अपेक्षांवर नियंत्रण ठेवा. व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. एखाद्या मोठ्या अडचणीवर तोडगा निघेल. 

कन्या- कामाच्या ठिकाणी एखादी नवी सुरुवात कराल. एखादा नवा प्रयोग करण्यात यशस्वी ठराल. जी चर्चा कराल, त्याच यशस्वी ठराल. आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वसामान्य असेल. दैनंदिन कामांचा फायदा होईल. 

तुळ- विचाराधीन कामं पूर्ण होतील. त्यापासून फायदाही मिळेल. कुटुंबाच्या जास्तीत जास्त कामांवर लक्ष द्याल. मित्रांसोबत जास्त वेळ व्यतीत कराल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि कामाच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. 

वृश्चिक- आजचा दिवस खास आहे. अनेक अशा गोष्टी समोर येतील ज्यापासून येत्या काही दिवसांमध्ये फायदा मिळेल. एखादी गुंतागुंत सोडवण्यात दिवस जाईल. कामाच्या ठिकाणी ओळखीच्या व्यक्तींची मदत मिळेल. दिवस शुभ असेल. 

धनु- नोकरी, करिअर आणि आर्थिक परिस्थितीच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. पदोन्नतीच्या प्रयत्नांमध्ये असाल तर, प्रयत्नांना यश मिळेल. कामाच्या ठिकाणी इतरांना प्रभावित कराल. तुमच्या मदतीसाठी अनेकजण तयार असतील. 

मकर- एखादं महत्त्वपूर्ण काम कराल. ज्याचा तुम्हाला फायदा होईल. जुनं काम आटोपण्याचा प्रयत्न कराल. अविवाहितांसाठी विवाहप्रस्ताव येतील. इतरांवर मात करण्याची इच्छा आणखी प्रबळ होईल. 

कुंभ- आज दिवसभर पैशांचाच विचार कराल. एखादं नवं काम करण्याच्या विचारात असाल, तर तशी संधीही मिळेल. धैर्य बाळगा. पुढे जाण्यासाठी तुम्हाला काहीतरी नवं शिकावं लागेल. आरोग्याची काळजी घ्या. 

मीन- आजच्या दिवशी जी कामं कराल त्यामध्ये फायदाच होईल. कामकाजातून पैसेही कमवू शकता. कागदोपत्री कामावर लक्ष ठेवा. प्रवासासाठी हा काळ सुखकर आहे.