close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आजचे राशीभविष्य | रविवार | २२ सप्टेंबर २०१९

जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस 

Updated: Sep 22, 2019, 07:44 AM IST
आजचे राशीभविष्य | रविवार | २२ सप्टेंबर २०१९

मेष- आज तुम्हाला स्वत:चं महत्त्वं कळेल. दैनंदिन कामं आटपाल. कोणा एका व्यक्तीशी नवं नातं आकारास येईल. राजकीय क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांना मोठं पद मिळण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायामध्ये मोठा फायदा होणार आहे. 

वृषभ- भावनांमध्ये चढ- उतार येण्याची शक्यता आहे. एखादी शुभवार्ता कळेल. तुम्हाला फायदा होण्याचा योग आहे. 

मिथुन- पैशांच्या बाबतीच तुमचं काम अडणार नाही. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. इतरांच्या मनात नेमकं काय सुरु आहे हे तुम्हाला चांगलंच कळेल. कौटुंबीक प्रश्न मार्गी लागतील. 

कर्क- अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या मोठ्या योजनेचा तुम्हाला फायदा होणार आहे. गरजवंतांची भेट घडेल. कोणत्याही नव्या गुंतवणुकीसाठी साथीदाराचा सल्ला घ्या. 

सिंह- कोणा एका व्यक्तीसोबत तुमच्या नातेसंबंधांमध्ये सुधारणा होण्याची चिन्हं आहेत. कोणत्याच कामाचा आग्रह धरु नका. एखाद्या जुन्या गुंतवणूकीचा तुम्हाला फायदा होणार आहे. 

कन्या- एखादं नवं वाहन खरेदी करण्याचा विचार कराल. आज तुम्ही जास्तीत जास्त संवेदनशील असाल. प्रवासयोग आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. 

तुळ-एखाद्या कामासाठी स्वत:ला पुढे कराल. पण, इतरांचा सल्लाही विचारात घ्या. कामाचा व्याप जास्त असेल. शुभकार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. नव्या मित्रांना भेटण्याची संधी मिळेल. 

वृश्चिक- कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कामं आटोपण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कामं आटोपण्याचा प्रयत्न कराल. देवाणघेवाणीच्या बाबतीत नशीबाची साथ मिळेल. 

धनु- कुटुंबाच्या साथीने काही महत्त्वाची कामं पूर्ण होऊ शकतात. धनलाभ होण्याची शक्यता आहे. पुढे जाण्याच्या नव्या वाटा मिळतील. 

मकर- जास्तीचा  वेळ हाताशी ठेवा. मकर राशीच्या व्यक्तीनी स्वत:ची काळजी घ्या. तुमच्या कामाची तपासणी होऊ शकते. 

कुंभ- कामाच्या पद्धतीमुळे मान मिळेल. साथीदाराकडून मोलाचं सहकार्य मिळेल. खर्च आणि गुंतवणूकीचा निर्णय तुम्हीच घ्या. तुम्हाला इतरांचं सहकार्य मिळेल. 

मीन- बरीच कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. अडचलेली कामं मार्गी लागतील. तुमच्या कामाने नोकरीच्या ठिकाणी अनेकांवर प्रभाव पडेल.