राशीभविष्य २५मार्च | 'या' राशींच्या व्यक्तींचा दिवस आनंदात जाणार

कसा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: Mar 25, 2020, 06:57 AM IST
 राशीभविष्य २५मार्च | 'या' राशींच्या व्यक्तींचा दिवस आनंदात जाणार
संग्रहित फोटो

मेष - कामाची जबाबदारी वाढेल. दिवसभर व्यस्त राहाल. व्यवसायात समजूतीने कामं घ्यावं लागेल. यश मिळेल. समस्या सोडवण्यासाठी मार्ग मिळेल.

वृषभ - जुन्या समस्या संपतील. स्वत:कडे लक्ष द्या. सक्रिय राहाल. कुटुंबातील समस्यांकडे लक्ष द्याल. अनेक नवीन कल्पना सुचू शकतात. खर्चाकडे लक्ष द्या. यश मिळवण्यासाठी धैर्य ठेवावं लागेल. 

मिथुन - धनलाभाची शक्यता आहे. दिवस आनंदात जाईल. कामातून अनेक पुढील दिवसांसाठी फायदा होऊ शकतो. अनेक विचार मनात सुरु राहतील. बुद्धीने तुमची कामं पूर्ण कराल. कुटुंबाची साथ मिळेल. चांगली बातमी मिळू शकते. आनंदी राहाल. 

कर्क - रखडलेले पैसे अचानक मिळू शकतात. पैशांसंबंधी गोष्टी सुधारू शकतात. इतरांशी असलेले गैरसमज सोडवण्याचा प्रयत्न करा. सहनशक्ती, व्यवहारकुशलतेमुळे अनेक गोष्टी सोडवू शकता. दिवस चांगला, आनंदात जाईल.

सिंह - उत्साही राहाल. महत्वाकांक्षा वाढेल. अपेक्षा नियंत्रणात ठेवा. मेहनतीने कामं पूर्ण कराल. अनेक दिवसांपासून असलेलं टेन्शन कमी होऊ शकतं.

कन्या - कामात नवीन प्रयोग केल्यास यश मिळेल. आजचा दिवस चांगला आहे. जोडीदारासोबत वेळ घालवाल. दररोजची कामं वेळेत पूर्ण होतील. कौटुंबिक समस्या सोडवल्या जाऊ शकतात. सकारात्मक विचार कराल. दिवस आनंदी असेल.

तुळ - आनंदी राहाल. सामाजिक कामांसाठी दिवस चांगला आहे. कुटुंबातील कामं पूर्ण करावी लागतील. मित्रांसोबत वेळ घालवाल. उधार दिलेले पैसे मिळू शकतात. धनलाभ होऊ शकतो. व्यवसायासाठी घेतले गेलेले निर्णय फायद्याचे ठरतील.

वृश्चिक - दिवस खास आहे. तुमच्या समजूतदारपणाचा फायदा होईल. तुमच्या कार्यक्षेत्रातील ओळखीच्या लोकांची मदत होऊ शकते. दिवस शुभ आहे. तब्येत चांगली राहील. 

धनु - पैशांसंबंधी दिवस चांगला आहे. घरात उत्साही वातावरण राहील. तब्येतीची काळजी घ्या. दिवसभर व्यस्त राहाल. इतरांना तुमची मतं पटवून देऊ शकाल.

मकर - कामासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. मेहनतीनेच यश मिळेल. नवीन कामाची सुरुवात करण्याआधी जुनी कामं करण्याकडे भर द्या. अविवाहितांसाठी दिवस चांगला आहे. 

कुंभ - धैर्याने काम कराल. दिवसभर पैशांबाबतीत विचार सुरु राहील. दररोजच्या कामांमध्ये अधिक वेळ जाईल. वेळ जाईल तशा गोष्टी सुधारण्यात मदत होईल. तब्येत चांगली राहील.

मीन - कोणताही निर्णय घेताना विचार करुनच पुढे जा. बोलताना वाणीवर संयम ठेवणं फायद्याचं ठरेल. जुन्या गोष्टींमध्ये रमाल. अनेक विचार मनात सुरु असल्याने कामात मन लागणार नाही. दिवस चांगला आहे.