close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आजचे राशीभविष्य | शुक्रवार | १५ मार्च २०१९

तुमचे भविष्य जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Updated: Mar 15, 2019, 08:27 AM IST
आजचे राशीभविष्य | शुक्रवार | १५ मार्च २०१९

मेष- कामाच्या व्यापासोबतच जबाबदारी वाढेल. दिवस व्यग्र असेल. व्यापाराच्या काही जबाबदाऱ्या पार पाडाल. नोकरीच्या ठिकाणी शांतता असेल. अडचणींचा सामना करण्यासाठी योजना आखाल. 

वृषभ- जुन्या अडचणी दूर होतील. स्वत:वर लक्ष द्या. नवे कपडे खरेदी करा. जास्तीत जास्त प्रमाणात सक्रिय असाल. समाज आणि कुटुंब अशा दोन्हीकडील महत्त्वाची कामं पूर्ण कराल. अनेक कल्पना सुचतील. खर्चांवर ताबा ठेवा. यशस्वी होण्यासाठी धीर राखा. मित्रांची मदत मिळेल. 

मिथुन- धनलाभ होण्याची चिन्हं आहेत. प्रदीर्घ काळासाठी चालणाऱ्या एखाद्या कामाचा फायदाच होईल. अनेक विचार आणि योजना आखाल. बुद्धीचातुर्याने कामं पूर्ण कराल. अविवाहितांचे विवाह प्रस्ताव मार्गी लागतील. मित्र आणि कुटुंबाचं सहकार्य लाभेल. शुभवार्ता कळेल. आनंदी असाल. बेरोजगारांसाठी दिवस चांगला असेल. 

कर्क- अचानक धनलाभ होण्याची चिन्हं आहेत. अडकलेले पैसे मिळण्याची चिन्हं आहेत. आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात. काही वाद लगेचच सोडवू शकाल. व्यवहारकौशल्य, सहनशक्तीच्या बळावर जास्तीत जास्त गोष्टींचे प्रश्न आपोआपच सुटतील. 

सिंह- आर्खि स्थितीत काही महत्त्वाचे बदल होऊ शकतात. ज्यामुळे तुम्हालाही आनंद मिळेल. महत्त्वाकांक्षी असाल. अपेक्षांच्या बाबतील संतुलित असाल. वरिष्ट तुमच्या कामाने प्रभावित असतील. नोकरीच्या ठिकाणी असणारा तणाव कमी होईल. 

कन्या- नोकरी आणि व्यापारात नवी पावलं उचलालय कामात नवे प्रयोत करा, यशस्वी व्हाल. दिवस चांगला आहे. ज्या गोष्टींचा विचार करताय त्यात यश मिळेल. साथीदारासोबत चांगला वेळ व्यतीत कराल. दैनंदिन कामं पूर्ण होतील. 

तुळ- विचारात असणारी कामं सुरू करा. फायदाच होईल. दिवस चांगला आहे. सामूहिक आणि सामाजिक कामांसाठी दिवस चांगला आहे. मित्रांना जास्त वेळ द्याल. गुंतवणूकीचे बेत आखाल. धनलाभ होऊ शकतो. काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. 

वृश्चिक- तुमच्यासाठी आजचा दिस खास असेल. काही असे प्रसंग समोर येतील ज्याचा तुम्हाला फायदा होईल. समजूतदारपणाचा वापर करा. कामाच्या ठिकाणी ओळखीच्या व्यक्तींची मदत होईल. नवे करार फायद्याचे ठरतील. दिवस चांगला असेल. नशिबाची साथ आहे. अडकलेले पैसे मिळतील. 

धनु- नोकरी आणि करिअरच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. नव्या नोकरीत बढती मिळू शकते. उत्साही असाल. नव्या व्यक्तींना भेटण्याचा योग आहे. अनेक लोकं तुमच्या मदतीसाठी तयार असतील. 

मकर- महत्त्वाची कामं पूर्ण होतील. ज्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. मेहनत करा, फळ मिळेल. जुनी कामं आटोपण्याचा तुम्हालाच फायदा होईल. जुनी कामं पूर्ण करण्यावर लक्ष द्या. 

कुंभ- धैर्याने पाऊल उचला. दिवसभर पैशांचाच विचार करत राहाल. जमिनीच्या गोष्टी फायद्याच्या ठरणार आहेत. दैनंदिन कामांचा व्याप जास्त असेल. कामाच्या ठिकाणी प्रगतीचा विचार कराल. आरोग्य उत्तम असेल. 

मीन- जी कामं कराल त्याचा फायदाच होणार आहे. कामातून अर्थार्जनाची संधी आहे. कागदोपत्री व्यवहार पूर्ण करा. प्रवासयोग आहेत.