मुंबई : आपल्या रोजच्या आहारात चपाती किंवा पोळी हा महत्वाचा घटक आहे. ज्यामुळे आपल्या शरिराला महत्वाचे घटक मिळतात. ज्यामुळे जवळ-जवळ प्रत्येक घरात त्याचा आहारात समावेश केला जातो. त्यात आपल्यापैकी बहुतेकांच्या घरातील लोकांना विचारुन चपात्या केल्या जातात. यामागचं उद्देश असतं की अन्न वाया जाऊ नये. परंतु तुम्हाला माहितीय का की वास्तुशास्त्रानुसार असं करणं खूपच चुकीचे आहे. होय घरातील सदस्यांच्या मते प्रत्येक रोटी मोजून बनवू नये कारण त्याचा परिणाम व्यक्तीवर तसेच संपूर्ण कुटुंबावर होतो.
वास्तुशास्त्रामध्ये घर, वाहन, करिअरपासून ते घरातील वस्तुंपर्यंत सर्वच गोष्टीबाबत सांगितले जाते. त्यात चपातीचा तसेत अन्नाचा देखील उल्लेख आहे. चला तर चपातीबाबत वास्तुशास्त्रात काय काय म्हटलं आहे ते जाणून घेऊ या.
वास्तुशास्त्रानुसार चपाती कधीही मोजून बनवू नयेत. कारण यामुळे घरात गरिबी येते. खरंतर अन्नपूर्णा धान्यात वास करते. अशा स्थितीत मोजून चपाती बनवल्यावर तिला राग येतो, त्यामुळे घरात अन्नाची कमतरता सोबतच धनाची हानी होते.
वास्तुशास्त्रानुसार घरातील सदस्यांच्या संख्येनुसार तुम्ही स्वत: विचार करुन चपात्या बनवा. त्यात 4-5 चपात्या तुम्ही जास्तीच्याच बनवा, कारण यामुळ आई अन्नपूर्णा प्रसन्न राहते आणि आर्थिक स्थिती उत्तम होते.
वास्तुशास्त्रात सांगितले आहे की चपाती बनवताना सर्वात आधी गाईसाठी चपाती बनवावी. एक चपातीच्या एवढी पिठाचा गोळा घ्या, ज्यामध्ये गूळ, साखर किंवा मध घाला आणि चपाची बनवा.
यासोबतच शेवटची चपाती ही कुत्र्यासाठी बनवा. तुम्ही जर असं दररोज केलंत, तर आई अन्नपूर्णा सोबत माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. यासोबतच कुत्र्याला भाकरी खाल्ल्याने शनिदोष, साडेसाती यांपासून तुम्हाला आराम मिळेल किंवा तुम्हा लांब राहाल.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)