Weekly Horoscope : 24 ते 30 जुलै 2023; काहींना अडचणी येतील तर काही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवतील, पाहा साप्ताहिक राशीभविष्य

या नव्या आठवड्यात काही राशींच्या व्यक्ती कुटुंबासोबत वेळ घालवतील तर काहींच्या घरात वाद होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया साप्ताहिक भविष्य!

सुरभि जगदीश | Updated: Jul 23, 2023, 08:20 PM IST
Weekly Horoscope : 24 ते 30 जुलै 2023; काहींना अडचणी येतील तर काही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवतील, पाहा साप्ताहिक राशीभविष्य title=

Horoscope Weekly (24 July to 30 July 2023): येत्या 24 जुलैपासून नवा आठवडा सुरु होणार आहे. या नव्या आठवड्यात काही राशींच्या व्यक्ती कुटुंबासोबत वेळ घालवतील तर काहींच्या घरात वाद होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया साप्ताहिक भविष्य!

मेष (Aries)

हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातील लोक तुमच्या जवळ येतील. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. कुटुंबात पत्नी आणि मुलांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबाशी चर्चा करून मोठी गुंतवणूक करू शकता.

वृषभ (Taurus)

हा आठवडा तुमच्यासाठी छान राहणार आहे. शारीरिक मानसिक तणावापासून दूर राहावं. वैयक्तिक कामे पूर्ण झाल्याने तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्ही तुमच्या जोडीदार मुलांसोबत छान वेळ घालवाल. कुटुंबात काही धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात.

मिथुन (Gemini)

या आठवड्यात तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. विरोधक तुम्हाला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमचे मन काही गोष्टींमुळे चिंताग्रस्त राहील. आठवड्याच्या उत्तरार्धात कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. सकारात्मक वातावरण निर्माण होईल.

कर्क (Cancer)

हा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत सावधपणे चालण्याची वेळ आहे. तुमच्या हातून काही मौल्यवान वस्तू निसटू शकतात. या आठवड्यात अपघात होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांशी काही मतभेद होतील. पत्नीवर दबाव टाकल्याने कुटुंबात वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. 

सिंह (Leo)

हा आठवडा तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असणार आहे. कुटुंबासोबत छान वेळ घालवाल. तुमच्या घरी पाहुण्यांचे आगमन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरातील वातावरण अधिक प्रसन्न होईल. तुम्ही कुटुंबातील काही समस्या सोडवण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबात तुमचा आदर आणि प्रतिष्ठा वाढेल. 

कन्या (Virgo)

हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. या आठवड्यात कुटुंबात नवीन सदस्य येऊ शकतो. कुटुंबासोबत आनंदाने हसत घालवाल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत भरपूर मनोरंजन किंवा सहलीचा आनंद घ्याल. अडचणींवर मात करणं शक्य होईल.

तूळ (Libra)

हा आठवडा तुमच्यासाठी अडचणींनी भरलेला असणार आहे. कौटुंबिक बाबींमध्ये मोठे मतभेद होऊ शकतात. त्यामुळे कुटुंबात अशांततेचे वातावरण राहील. यासोबतच कुटुंबात वडिलोपार्जित संपत्ती इत्यादींबाबत वाद वाढू शकतात. कुटुंबात नकारात्मक वातावरण निर्माण करणे टाळा.

वृश्चिक (Scorpio)

या आठवड्यात तुम्हाला अनेक समस्यांमधून जावं लागणार आहे. अपघात घडू शकतात. कुटुंबात मुले आणि पत्नीसह काही बाबींवर मतभेदांची परिस्थिती निर्माण होईल. कुटुंबातील सदस्य तुमच्याविरुद्ध मोठा कट रचू शकतात. या आठवड्यात कुटुंबात काही दुःखद बातमी येणार आहे.

धनु (Sagittarius)

हा आठवडा तुमच्यासाठी चांगला मानला जातोय. एखाद्या विशेष व्यक्तीकडून तुम्हाला फायदा होऊ शकतो. कुटुंबासोबत नियोजन करून तुम्ही बाहेर फिरायला जाऊ शकता. तुम्हाला पत्नी आणि मुलांकडून भरपूर प्रेम मिळेल. कुटुंबात मोठा निर्णय घेतल्याने तुमचा सन्मान वाढेल.

मकर (Capricorn)

हा आठवडा तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल. कोर्टात सुरू असलेल्या वादात तुम्हाला विजय मिळेल. कुटुंबातील पत्नी आणि मुलांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. कुटुंबासोबत चित्रपट वगैरे पाहायला जाऊ शकता.

कुंभ (Aquarius)

या आठवड्यात तुम्हाला काही वाईट बातमी मिळू शकते. तुमचे मन अशांत राहील. पत्नीशी मतभेद वाढू शकतात. तुमच्या वागण्यामुळे कुटुंबातील सदस्य काळजीत राहतील.

मीन (Pisces)

हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहील. खास व्यक्तीशी भेट होईल जी तुमच्यासाठी आगामी काळात फायदेशीर ठरेल. ओळखीच्या व्यक्तीच्या आगमनाने कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कुटुंबातील मुले, पत्नी आणि पालकांसोबत चांगला वेळ घालवाल. विशेष निर्णय घेतल्याने कुटुंबातील सदस्यांचा तुमच्याबद्दल आदर वाढेल.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )