Horoscope Money Weekly : 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2023; सूर्य गोचरमुळे 'या' राशींच्या लोक होतील मालामाल, पाहा साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य

Weekly Career Horoscope 14 to 21 August : हा आठवडा बुधादित्य राजयोगामुळे (Budhaditya Rajyog) अनेक राशींवर धनवर्षाव होणार आहे. जाणून घ्या या आठवड्याचे आर्थिक राशीभविष्य

नेहा चौधरी | Updated: Aug 13, 2023, 10:25 PM IST
Horoscope Money Weekly : 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2023; सूर्य गोचरमुळे 'या' राशींच्या लोक होतील मालामाल, पाहा साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य title=
weekly money career horoscope 14 to 20 august 2023 lucky zodiac signs Surya Gochar Budhaditya Rajyog get money success arthik rashi bhavishy Surya Gochar 2023

Horoscope Money Weekly (14- 20 August 2023) : ऑगस्टचा तिसरा आठवड्यात सूर्य सिंह राशीत गोचर (Surya Gochar 2023) करणार आहे. त्यामुळे सिंह राशीत बुधादित्य राजयोग (Budhaditya Rajyog) तयार होतो आहे. त्यामुळे अनेक राशींना धनलाभ होणार आहे. आर्थिक आणि करियरच्या दृष्टीकोनातून हा आठवडा कसा असेल जाणून घ्या. 

मेष (Aries)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्टी चढ आणि उतारवाला असणार आहे. धनलाभ होणार आहे, पण चिंता वाढणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात सुख-समृद्धीचा योग आहेत. प्रवासाचे योग असून त्यासाठी श्रीमंत महिला तुमच्या मदतीला येणार आहे. कामाच्या ठिकाणी एखाद्या महिलेमुळे त्रास आणि गरज नसताना ताण येणार आहे. 

शुभ दिवस: 16, 17, 18

वृषभ (Taurus) 

या लोकांसाठी हा आठवडा दान धर्म करण्याचा असणार आहे. या दानधर्मातून तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. कार्यक्षेत्राच्या ठिकाणी आठवड्याच्या मध्यानंतर अचानक आनंदाची बातमी मिळणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीमधून सुख-समृद्धीचा योग आहे. प्रवास तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी विचारपूर्वक निर्णय घ्या. 

शुभ दिवस: 14, 16, 17

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत शुभ असणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी यशस्वी सिद्ध होणार आहे. मात्र कामाच्या ठिकाणी नुकसान होऊ शकतो. आर्थिक बाबींमध्ये हा आठवडा खर्चिक असणार आहे. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीकडे लक्ष देणे गरजेचं आहे. आरोग्यासाठी खर्च होणार आहे. कौटुंबिक बाबतील निर्णय पुढे ढकला. 

शुभ दिवस: 15, 17, 18

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक दृष्टीकोनातून चांगला असणार आहे. मजबूत व्यक्तिमत्व असलेल्या स्त्रीकडून आर्थिक लाभ होणार आहे. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक  निर्णय घ्या. कुटुंबात तुमच्या मताला मान मिळणार आहे. प्रवासातूनही यश प्राप्त होईल. आठवड्याच्या शेवटी धार्मिक कार्य घडणार आहे. 

शुभ दिवस: 14, 15, 16

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांचा या आठवड्यात कुटुंबासोबत आनंदात जाणार आहे. मन प्रसन्न असणार आहे. प्रवासातून यश प्राप्त होणार आहे. या आठवड्यात प्रेमसंबंधातही सुख-समृद्धीचं शुभ संयोग घडणार आहे. कामाच्या ठिकाणी समस्या वाढणार आहे. आर्थिक बाबतीत हा आठवडा खर्चिक असणार आहे. 

शुभ दिवस: 15, 17, 18

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांचं भाग्य या आठवड्यात चमकणार आहे. तुम्ही कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवणार आहात. सहली यशस्वी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बाजूने खूप प्रयत्न करावा लागणार आहे. प्रेमसंबंधात वेळ रोमँटिक असणार आहे. आर्थिक प्रगतीसाठी जोखीम घ्यावी लागणार आहे. कार्यक्षेत्रातील नवीन प्रोजेक्टबद्दल मनात भीती असणार आहे. 

शुभ दिवस: 16,18

तूळ (Libra)

या राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये हा आठवडा यश घेऊन आला आहे.  आर्थिक बाबींमध्ये हा आठवडा लाभदायक असणार आहे. तुम्ही कोणत्याही नवीन गुंतवणुकीमध्ये पैसे गुंतवणार आहात. कुटुंबाच्या सहवासात आनंदायी हा आठवडा जाणार आहे. आठवड्याच्या शेवटी थोडा खर्च होणार आहे. 

शुभ दिवस: 15, 16, 18

वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांनी हा आठवड्यात संयम बाळगण्याची गरज आहे. कार्य क्षेत्रात मनाचं ऐकून निर्णय घेतल्यास चांगला परिणाम दिसणार आहे. घरातील ज्येष्ठ महिलांवर खर्च होणार आहे. आरोग्याकडे तुम्ही या आठवड्यात जास्त लक्ष देणार आहे. या आठवड्यात प्रवास टाळणं योग्य ठरणार आहे. 

शुभ दिवस: 16, 18

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांच्या कामाच्या ठिकाणी प्रगती घेऊन आला आहे. तुमचा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी एखाद्या स्त्रीची मदत होणार आहे. प्रवासातून यश मिळणार आहे. सप्ताहाच्या शेवटी मन एखाद्या तरुण व्यक्तीबद्दल तुम्ही चिंतेत असणार आहात. एखादी बातमी मिळाल्याने मन दुःखी होणार आहे. 

शुभ दिवस: 15, 16, 17

मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत हा आठवडा ठिक ठिका असणार आहे. पाटर्नरशीपमधून केलेली गुंतवणूक तुम्हाला धनलाभ होणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगतीचे योगायोग आहे. या आठवड्यात प्रवास पुढे ढकला. आठवड्याच्या शेवटी आपल्या प्रियजनांच्या सहवासात आनंददायी वेळ जाणार आहे.

शुभ दिवस: 16, 18

कुंभ (Aquarius) 

या राशीच्या लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. नवीन योजनेतून यश मिळणार आहे. कौटुंबिक सहवासात आनंददायी वेळ जाणार आहे. या आठवड्यात आर्थिक खर्च वाढणार असून त्याकडे लक्ष द्या. आठवड्याच्या शेवटी सुख-समृद्धीचा योग असेल आणि चांगली बातमी मिळणार आहे. 

शुभ दिवस: 16, 18

मीन (Pisces)

या राशीच्या लोकांना हा आठवडा प्रगती घेऊन आला आहे. कुटुंबातील सदस्यांसह प्रवासाला जाणार आहात. कुटुंबाच्या सहवासात आनंददायी वेळ जाणार आहे. आर्थिक बाबींमध्ये जोखीम घेऊन केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. सप्ताहाच्या शेवटी सुख-समृद्धीचा शुभ संयोग असणार आहे. 

शुभ दिवस: 14, 16, 18

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)