आठवड्यातील 7 दिवस हे रंग फॉलो करा, दिवस जाईल मनासारखा

रंगांचा आपल्या आयुष्यावर कसा पडतो परिणाम? आठवड्याभरात कोणत्या दिवशी कोणता रंग वापरावा?

Updated: May 13, 2022, 10:43 AM IST
आठवड्यातील 7 दिवस हे रंग फॉलो करा, दिवस जाईल मनासारखा title=

मुंबई : कपडे खरेदी करताना किंवा ते मॅच करताना ड्रेसिंग सेन्स आणि रंगांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचसोबत नवीन कपडे कधी घालावेत यामागेही शास्त्रीय कारण आहे. कोणत्या रंगाचे कपडे कधी घालावेत हे देखील सांगण्यात आलं आहे.

कोणते रंग कोणत्या दिवशी शुभ असतात आणि कोणते रंग अशुभ ठरतात हे जाणून घेऊया. याशिवाय नवा कोरा कपडा कोणत्या दिवशी अंगावर घालण्यासाठी काढावा हे देखील पाहूया.

रविवार- या दिवशी क्रीम कलरचे कपडे घालावेत. नुसते क्रीम कलर नसतील तर क्रीम कलरसोबत गुलाबी, सोनेरी किंवा नारंगी रंगाचे कॉम्बिनेशन चालेल. निळा, काळा, राखाडी आणि तांबड्या रंगाचे कपडे घालू नयेत. 

सोमवार- सोमवारी शक्यतो हलक्याफुलक्या शेडचे रंग परिधान करायला हवेत. शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे कपडे घाला. काळे किंवा लालभडक कपडे घालणं टाळा.

मंगळवार- या दिवशी लाल रंगाचे कपडे घालू शकता. गुलाबी किंवा लाल रंगाच्या कोणत्याही शेडचे कपडे तुम्ही या दिवशी घालू शकता. क्रीम किंवा पिवळ्या रंगाचे कपडेही घालू शकता. या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे घालणं टाळा.

बुधवार- या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे धारण करू शकता. राखाडी किंवा काळ्या रंगाचे कपडेही तुम्ही या दिवशी घालू शकता. 

गुरुवार- केशरी रंग या दिवशी धारण करणं शुभ मानलं जातं. पिवळ्या रंगाचे शेडही तुम्ही कपड्यांमध्ये घालू शकता. क्रीम, पांढरा, गुलाबी यासारखे रंगसंगती वापरू शकता. 

शुक्रवार- राखाडी, काळा, निळा, हलक्या हिरव्या रंगाचे शेड तुम्ही कपड्यांमध्ये वापरू शकता. या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालणं टाळा. 

शनिवार- निळा, काळा, राखाडी, हिरवा रंग या दिवशी परिधान करावा. या दिवशी लाल रंगाचे कपडे घालू नयेत. 

नवीन वस्त्र घालण्यासाठी शुक्रवार हा शुभं वार आहे. बुधवारीही नवे कोरे कपडे घालू शकतात. सोमवारी नवे कपडे घालणं तेवढं शुभ किंवा अशुभ नसतं. मंगळवारी आणि रविवारी नवे कपडे घालू नयेत.