White Spot on Nails: लकी ठरते नखावरील ही छोटी निशाणी, जीवनात धनसंपत्तीसह मिळते ऐश्वर्य

Nail Astrology in Marathi : आपल्या हाताच्या नखावरील एक छोटी निशाणी तुमच्यासाठी खूप लकी असते. याबद्दल अधिक जाणून घ्या.

Updated: Jan 13, 2023, 09:37 AM IST
White Spot on Nails: लकी ठरते नखावरील ही छोटी निशाणी, जीवनात धनसंपत्तीसह मिळते ऐश्वर्य

Black and White Spots On Nails: आपल्या हाताच्या रेषावरुन भविष्य सांगितले जाते. पण आता हाताच्या बोटांवरील नखांवर ही छोटी निशाणी तुमच्यासाठी लकी अर्थात भाग्यवान ठरते. (Spirituality News) नखाचा आकार, रंग, काळ्या आणि पांढऱ्या खुणा किंवा नखांवरचे डाग व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि भविष्याबद्दल बरेच काही सांगतात. विशिष्ट बोटाच्या नखावरील पांढरी निशाणी नशीब तुमचे नशीब बदलू शकते. (Nail Astrology in Marathi )

ज्योतिषशास्त्रात नखांच्या आकार आणि रंगावरुन व्यक्तीच्या जीवनातील अनेक पैलू जाणून घेण्याच्या पद्धती सांगण्यात आल्या आहेत. त्याचवेळी, नखांवर असलेले काळी किंवा पांढरी निशाणी केवळ व्यक्तिमत्व-भविष्याबद्दलच सांगत नाहीत तर व्यक्तीच्या आरोग्याचे रहस्य देखील उघड करते. नखे पाहून अनेक रोग ओळखता येतात. त्याचवेळी, नखांवरचे हे पांढरे किंवा काळे डाग त्या व्यक्तीच्या नशिबात काय वाढून ठेवले आहे, तेही सांगतात. यासोबतच ते भविष्याशी संबंधित शुभ आणि अशुभ संकेतही देतात. 

नखांवर असणाऱ्या या डागांचा अर्थ 

समुद्रशास्त्रानुसार वेगवेगळ्या बोटांवर पांढरे किंवा काळे ठिपके किंवा डाग वेगवेगळे असतात.  बोटांवरील नखांवर काळ्या आणि पांढऱ्या खुणांमुळे कोणते शुभ आणि अशुभ चिन्ह, हे जाणून घ्या.

अंगठ्याचे नख : हाताच्या अंगठ्याच्या नखावर पांढरे डाग किंवा निशाणी असल्यास ते शुभ मानले जाते. असे लोक नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी खूप पुढे जातात. दुसरीकडे, अंगठ्याच्या नखावर एक काळी खूण व्यक्तीचा राग प्रतित करते. अशा व्यक्ती खूप रागीट असतात. आणि त्या व्यक्ती रागाच्या भरात मोठा गुन्हाही करु शकतात.

तर्जनीचे नख : तर्जनी नखावर पांढरा डाग असल्‍याने व्‍यवसायात व्‍यक्‍तीला भरपूर नफा मिळतो. असे लोक आनंदी जीवन जगतात. दुसरीकडे, तर्जनीच्या नखावर काळे डाग असणे हे जीवनातील अनेक समस्यांचे लक्षण आहे. 

मधले बोटाचे नख :  हाताच्या मधले बोट.  म्हणजे हाताच्या मध्यभागी सर्वात लांब बोट. या बोटाच्या नखावर पांढरा डाग असेल तर त्या व्यक्तीला खूप प्रवास करायला लावते. फायदेही देतात. दुसरीकडे, मधल्या बोटाच्या नखेवर काळे चिन्ह नकारात्मकतेचे लक्षण आहे. 

अनामिका नख : अनामिका किंवा अनामिकेच्या नखावर पांढरा डाग किंवा निशाणी असल्‍याने मुळ राशीला अपार संपत्ती आणि समृद्धी मिळते. दुसरीकडे, काळ्या चिन्हामुळे बदनामी किंवा निंदा होण्याची शक्यता निर्माण होते. 

लहान बोटाचे नख : हाताच्या करंगळीच्या नखेवर पांढर्‍या रंगाची खूण एखाद्या व्यक्तीच्या कारकिर्दीत मोठे यश मिळवते. जेव्हा काळे डाग किंवा निशाणी दिसते तेव्हा अशा व्यक्तीला त्याच्या करिअरमध्ये खूप संघर्ष करावा लागतो. अशा व्यक्तीला नोकरी-व्यवसायात अपयशाला सामोरे जावे लागते. 

(Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)