Garuda Purana : दररोज आंघोळ न करणारी व्यक्ती बनते पापी; गरुड पुराणात काय सांगितलंय?

Garuda Purana : गरुड पुराणामध्ये भगवान विष्णु आणि त्यांचे प्रिय वाहन गरुड यांच्यात एक चर्चा झाली. यामध्ये प्रत्येक व्यक्तीने दररोज आंघोळ करावी असे सांगितले आहे. स्नान आणि परमेश्वराचे स्मरण करणे अत्यंत गरजेचे आहे. आंघोळ ही आपल्या दिनचर्येतील महत्वाची गोष्ट असते. आरोग्याप्रमाणेच अध्यात्मामध्ये देखील याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 17, 2023, 07:23 PM IST
Garuda Purana : दररोज आंघोळ न करणारी व्यक्ती बनते पापी; गरुड पुराणात काय सांगितलंय?  title=

हिंदू धर्मग्रंथांमध्ये गरुड पुराणाला विशेष स्थान आहे. गरुड पुराणात भगवान विष्णूने पक्षी राजा गरुडला जीवनातील महत्त्वाचे गुण सांगितले आहेत. तसेच एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या आपले जीवन सहजतेने कसे जगू शकते हे देखील स्पष्ट केले. असे मानले जाते की, या गोष्टींचे पालन करणार्‍या व्यक्तीला केवळ आयुष्यातच नाही तर मृत्यूनंतरही आनंद मिळतो. गरुड पुराणात स्नान आणि पूजा या दोन्ही विषयांचे तपशीलवार वर्णन केले आहे. जे रोज आंघोळ करत नाहीत ते पापात सहभागी असतात आणि त्यांच्या हयातीतच त्याची शिक्षा होते असे त्यात नमूद केले आहे. चला जाणून घेऊया रोज आंघोळ का महत्त्वाची मानली जाते?

गरुड स्नान न करण्याबद्दल काय सांगितलंय?

  • भगवान विष्णूने गरुड पुराणात सांगितले आहे की, जी व्यक्ती दररोज स्नान करत नाही तो जाणूनबुजून किंवा नकळतपणे नकारात्मक शक्ती स्वतःकडे आकर्षित करत असतो. अपवित्र असल्यामुळे नकारात्मकता वाढते. 
  • दररोज आंघोळ केल्याने तुम्ही सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे ओढून घेता. यामुळे दररोज न चुकता आंघोळ करावी.
  • असे देखील म्हटले जाते की, जर तुम्ही दररोज स्नान आणि ध्यान केले नाही तर देवी लक्ष्मी कोपते. त्यामुळे व्यक्तीला अनेक प्रकारच्या आर्थिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा व्यक्तीच्या घरात नेहमीच अडथळे येतात.
  • नित्य नियमाने आंघोळ केल्याने पवित्र ऊर्जा निर्माण होते. तुमचा दिवस अतिशय उत्साहात सुरू होतो. ज्याचा दिनक्रमावर नक्कीच सकारात्मक परिणाम होतो. 
  • कोणतेही धार्मिक कार्य सुरू करण्यापूर्वी स्नान करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आंघोळ केल्याने शारीरिक शुद्धता तर येतेच पण मानसिक ताणही दूर होतो. त्यामुळे भगवंताचे नामस्मरण आणि प्रार्थना करणे सोपे जाते.
  • गरुड पुराणात सांगितले आहे की, जे ब्रह्म मुहूर्तावर स्नान करतात त्यांना ऐहिक व परलोकीय फळे मिळतात. त्याच वेळी, त्याचे मन सदैव श्रद्धेमध्ये गुंतलेले असते आणि सांसारिक चिंतांपासून दूर राहून तो आपले जीवन सहज जगतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)