मुंबई : 'महिलांना समजून घेण, म्हणजे सर्वात मोठा टास्क...' असं अनेकदा तुम्ही देखील ऐकलं असेल. महिलांना कधी कोणत्या गोष्टीचं वाईट वाटेल आणि कधी त्या आनंदी असतील काही सांगू शकत नाही. जेव्हा महिला नाराज असतात, तेव्हा त्यांना त्यांच्या आवडत्या गोष्टी करायला आवडतात. अनेकदा अशा परिस्थितीत प्रत्येक महिलेला एकटं राहायला आवडतं. पण महिलांची ही गोष्ट पुरुषांना खटकते. राग, नाराज किंवा कोणत्याही गोष्टीचं वाईट वाटलं तर महिला त्यांच्या आनंदासाठी काही गोष्टी करतात, त्या आपण आज जाणून घेऊ...
शॉपिंग करणं....
परिस्थिती कशीही असो... महिलांना शॉपिंग करायला प्रचंड आवडतं. मित्र, भाऊ, बहिण, आई-वडील किंवा पतीसोबत भांडण झालं तर, महिला प्रचंड दुःखी होतात. अशा परिस्थितीत त्यांना शॉपिंग करायला आवडतं. पण महिलांच्या या सवयीमुळे पुरुषांचा जळफळाट होतो.
स्ट्रीट फूडची मज्जा घेणं
एकट्यात स्ट्रीट फूडची मज्ज घ्यायला महिलांना प्रचंड आवडतं. कधीकधी महिलांना त्यांचा मी-टाईम एन्जॉय करायला आवडत. अशा परिस्थितीत त्या नक्कीच पाणीपूरी खातात. हे सर्व केल्याने त्यांचा मूड काही मिनिटांतच सुधारतो असे नाही तर त्यांना आनंदही मिळतो. पण महिलांच्या या सवयीमुळे पुरुषांचा जळफळाट होतो.
डान्स किंवा गाणं म्हणणं
डान्स आणि गायन हा काही लोकांचा व्यवसाय आहे, परंतु काहीजण त्यांच्या छंदासाठी डान्स आणि गायन करतात. स्वत: मानसोपचार तज्ज्ञ देखील सल्ला देतात की तुम्ही तुमचे ते छंद जरूर जोपासा, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. म्हणून जोडीदाराशी भांडण झाल्यावर महिलांनी नृत्य, गाणं आणि पेंटिंग सारखे काहीतरी करायला आवडतात.
सोलो ट्रीप
मित्र, जोडीदार आणि कुटुंबासोबत प्रवास करण्याची स्वतःची मजा असते, पण एकट्याने प्रवास केल्याने तुम्हाला स्वतःला शोधण्याची संधी मिळते. ज्या महिलांना स्वतःच्या आनंदासाठी हे करायला आवडते. या दरम्यान ती मनमोकळेपणाने एन्जॉय करते. पण महिलांच्या या सवयीमुळे पुरुषांचा जळफळाट होतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE24TAAS याची पुष्टी करत नाही.)