Yashoda Jayanti 2023 : संतान प्राप्तीसाठी यशोदा जयंती खास; तारीख, शुभ वेळ आणि महत्त्वं जाणून घ्या

Yashoda Jayanti 2023 : यशोदा जयंती फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या सहाव्या दिवशी ही साजरी करण्यात येते. महिलांच्या दृष्टीने या दिवसाला खास महत्त्वं आहे. 

Updated: Feb 11, 2023, 06:53 AM IST
Yashoda Jayanti 2023 : संतान प्राप्तीसाठी यशोदा जयंती खास;  तारीख, शुभ वेळ आणि महत्त्वं जाणून घ्या title=
Yashoda Jayanti 2023 date 12 February 2023 puja vidhi upay Shubh Muhurat and significance in marathi news

 

Yashoda Jayanti 2023 : फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या रविवारी सहावा दिवस...रविवारी ममतेची मूर्ती यशोदा मातेची जयंती...यशोदा माता ही कृष्णाची पालक माता. देवकीच्या पोटी कान्हाचा जन्म झाला पण कृष्णाचं पालनपोषण यशोदा मातेने केलं. यशोदा जयंतीला स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्य, संरक्षण आणि उज्ज्वल भविष्यासाठी उपवास करतात. या दिवशी कृष्ण मंदिरात बालगोपाल आणि आई यशोदा यांची पूजा, भजन आणि कीर्तन केले जाते. गुजरात, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात हा सण खास असतो. 

यशोदा जयंती 2023 कधी आहे?

फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी 11 फेब्रुवारी 2023 ला म्हणजे आज सकाळी 09.05 वाजता सुरू होईल. उद्या 12 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 09.47 वाजता संपेल. 12 फेब्रुवारी 2023 रोजी यशोदा जयंती उत्सव साजरा केला जाईल. (Yashoda Jayanti 2023 date 12 February 2023 puja vidhi upay Shubh Muhurat and significance in marathi news)

पूजा मुहूर्त - 12 फेब्रुवारी 2023 ला सकाळी 09.54 ते सकाळी 11.17 

यशोदा जयंतीचं महत्त्व

यशोदा मातेला ममतेचं प्रतीक मानलं जातं. यशोदा जयंतीच्या दिवशी आई यशोदा आणि कृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा केल्याने बालकांना कोणताही धोका होत नाही, अशी धार्मिक श्रद्धा आहे. श्रीकृष्ण स्वतः साधकाच्या मुलाचं रक्षण करतात. यशोदा जयंतीला अनेक स्त्रिया संततीप्राप्तीसाठी उपवास करतात. वैष्णव परंपरेचे लोक जगभरात हा सण उत्साहात साजरा करतात. असं मानलं जातं की या व्रताच्या प्रभावामुळे मुलामध्ये श्रीकृष्णाचे गुण येतात. बालक सुखी आणि समृद्ध राहतो, असं शास्त्रात मानलं जातं. 

यशोदा जयंती पूजा विधी

यशोदा जयंतीला ब्रह्म मुहूर्तावर स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करून व्रत करावे. पूजास्थानावर लाल कपडा पसरवा आणि माता यशोदेच्या मांडीवर बसलेल्या कृष्णाचं चित्र स्थापित करा. असा फोटो नसल्यास दिवा लावून कान्हाची पूजा करावी. आई यशोदेला लाल चुणरी अर्पण करा. रोळी, कुंकुम, फुले, तुळस, धूप, दिवा लावून पूजा करावी. कन्हैया आणि यशोदा यांना पान, केळी आणि लोणी अर्पण करा. गोपाल मंत्राचा एक जप करावा. गोपाळांची आरती करावी. या दिवशी 11 लहान मुलींना खाऊ घाला. पूजा झाल्यावर गाईला हिरवा चारा खाऊ घाला.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)