'या' पाच मुलांनाही 'सचिन' प्रमाणे संधी मिळाली तर येईल धम्माल

आता अनेक युवा टीम इंडियामध्ये येण्यास उत्सूक आहेत पण त्यांना संधी मिळत नाहीए.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 2, 2017, 01:19 PM IST
 'या' पाच मुलांनाही 'सचिन' प्रमाणे संधी मिळाली तर येईल धम्माल title=

मुंबई : १५ नोव्हेंबर १९८९ जेव्हा सचिन तेंडुलकरने पाकिस्तानविरुद्ध टेस्ट डेब्यू केला तेव्हा त्याचे वय १६ वर्ष २०५ दिवस होते. त्याचप्रमाणे ९ मार्च २००२ ला जेव्हा पार्थिव पटेलने इंग्लडविरुद्ध डेब्यू केले तेव्हा तो साधारण १७ वर्षाचा होता.

त्यावेळी युवा खेळाडूंना खेळण्याची संधी मिळत होती. पण आता अनेक युवा टीम इंडियामध्ये येण्यास उत्सूक आहेत पण त्यांना संधी मिळत नाहीए.

१)शुभम गिल : 

Shubman Gill

हा अंडर १९ टीम मधला पंजाबचा स्टार खेळाडू आहे. २०१७ मध्ये इंग्लडविरुद्धच्या अंडर १९ सिरीजमध्ये शुभमने सलग २ शतक झळकावले.

त्या जोरावर टीम इंडिया इंग्लडला ५-० अशी मात देऊ शकली. पिचवर जास्त वेळ टीकून राहण्यास तो सक्षम आहे. आज ना उद्या तो टीममध्ये खेळताना नक्की दिसेल.

२) अनमोलप्रित सिंह :

Anmolpreet Singh

पंजाबच्या बॅटींगचे वादळ अशी ओळख असलेल्या अनमोलप्रितने रणजी ट्रॉफीत  ७५३ रन्सची जबरदस्त खेळी केली.

याच्यामध्ये भविष्यातील उत्तम खेळाडू म्हणून पाहिले जाते. 

३) राहुल चहर : 

Rahul chahar

आयपीएल २०१७ मध्ये रायझिंग पुण्याच्या टीमने या खेळाडूसाठी बोली लावल्यानंतर राहुल चहर चर्चेत आला.

१८ वर्षाच्या राहुलने अंडर १९ मध्ये इंग्लडविरूद्ध मोक्याच्या क्षणी विकेट घेत सर्वांना चकित केले. राहुल आक्रमक लेग स्पिनर आहे. 

४) पृथ्वी शॉ : 

prithvi shaw

२०१६-१७ च्या रणजी सीझनमध्ये पृथ्वी शॉने मॅच विनिंग शतक झळकावले. तो रणजीतील त्याचा डेब्यू होता.

नुकत्याच झालेल्या रणजी मध्ये त्याने ५२१ रन्सची खेळी केली. लवकर तो टीम इंडियात पदार्पण करेल. 

५) वाशिंग्टन सुंदर : 

washington sundar

वाशिंग्टन सुंदर असा स्पिनिंग ऑल राऊंडर आहे ज्याचा खेळ पाहून सर्वजण थक्क होतात.

२०१७ च्या आयपीएल सीझनमध्ये रायझिंग पुणे सुपरजाएंट्साठी शानदार बॉलिंग केली. तामिळनाडू प्रिमीयर लीगमध्ये सुंदर हा मॅन ऑफ द टूर्नामेंट म्हणून निवडला गेला होता.