भारतापुढे जिंकण्यासाठी १५८ धावांचे लक्ष्य

कुलदिप यादवकडून चांगली कामगिरी दिसली आहे

Updated: Jan 23, 2019, 10:48 AM IST
भारतापुढे जिंकण्यासाठी १५८ धावांचे लक्ष्य title=

न्युझीलंड संघाचा अंतिम विकेट पडली असून भारताला जिंकण्यासाठी १५८ धावाचे लक्ष्य गाठावे लागणार आहे.

पहिल्या सामन्यात कुलदिप यादवकडून चांगली कामगिरी दिसली आहे. न्यझीलंडचा ९ विकेट गेले आहे. कुलदिप यादवने लॉकी फर्ग्युसनला विकेटकिपर धोनीच्या हाताने स्टंपिंग केले. न्युझीलंड १४९/९ (३६ ओव्हर)

कुलदीपयादवने ब्रेसवेलचा आठवा विकेट घेतला. कुलदिपने ब्रेसवेला बोल्ड केले. ब्रेसवेलने केवळ ७ रन केले. न्युझीलंड १४६/८ (३४ ओव्हर)

 भारत आणि न्युझीलंडच्या सामन्यात न्युझीलंड संघ धडपड करत आहे. न्युझीलंडचा कर्णधार विलियमसनने आपला विकेट गमवला असल्यामुळे मैदानात निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंतच्या सामन्यात विलियमसन संयमात खेळताना दिसत होते. कुलदिप यादवने विलियमसनचा विकेट घेवून भारताचा पल्ला आणखी मजबूत केला आहे. न्युझीलंडच्या संघाकडून विलियमसनने सर्वाधिक ६४ (८१) धावा केल्या.
 
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाची बाजू मजबूत होत असताना दिसत आहे. न्युझीलंड संघाचा सहावा विकेट्स गेला आहे. पहिल्या सामन्यात आणखी एक विकेट शामीने त्याच्या खात्यात जोडला आहे. शामीने इनिंगच्या तिसव्या ओव्हरमध्ये सैंटनरला एलबीडब्ल्यू केले. सैंटनरने १ चौकार आणि १ षटकारच्या मदतीने १४ रन केले. न्युझीलंड १३३/६ ( ३० ओव्हर)

न्युझीलंडच्या संघाला फिरकी गोलंदाजांसमोर मोठी मेहनत करावी लागत आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्युझीलंडचा पाचवा विकेट पडला आहे. केदार जाधवच्या गोलंदाजीवर कुलदीप यादवने झेल करुन निकोल्सला (१२ रन) माघारी धाडले. तसेच दुसऱ्या बाजूस न्युझीलंडचा कर्णधार विलियनसन (४६) संयमी खेळी करत आहे. त्याने संघाचा स्कोर २३ ओव्हरमध्ये शंभर पार केला. न्यझीलंड १०७/५ (२४ ओव्हर) 

भारत आणि न्युझीलंडच्या एकदिवसीय सामन्यात युजवेंद्र चहलने एकोणीसव्या षटकात भारताला विकेट मिळवून दिला आहे. चहलने टॉम लाथमचा विकेट घेवून घेतला आहे. लाथम १० चेंडूचा सामना करत ११ रन केले. न्युझीलंड  77/4 (19 ओव्हर)

भारत आणि न्युझीलंडमध्ये सुरु असलेल्या एकदिवसीय पहिल्या सामन्यात युजवेंद्र चहलने भारतीय संघाला तिसरा विकेट मिळवून दिला. खतरनाक फलंदाज रॉज टेलर स्वत:च्या गोलंदाजीवर झेल घेवून न्युझीलंड संघासाठी अडचण निर्माण केली आहे. टेलरने ४१ चेंडूचा सामना ३ चौकारच्या मदतीने २४ रन केले. 

मोहम्मद शामी ने इनिंगच्या चौथ्या ओव्हरमध्ये कोलिंग मुनरोला बोल्डकरुन न्युझीलंडला दुसरा झटका दिला. मुनरो ने दोन चौकारच्या मारुन ८ रन केले. न्यूझीलंड 18/2 (4 ओव्हर)

मोहम्मद शामीने त्याच्या दुसऱ्या षटकात  मार्टिन गप्टीलच्या रुपात  न्युझीलंड संघाला पहिला झटका दिला. गप्टिलने ५ रन केले. न्युझीलंड 5/1 (2 ओव्हर)

भारतीय संघासाठी भुवनेश्वर कुमारने पहिली ओव्हर फेकली.  न्युझीलंड संघाला मुनरो आणि मार्टिन गप्टील ने सलामी दिली. न्यूझीलंड 5/0 (1 ओव्हर)
 
न्युझीलंड संघाने नाणे फेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय केला आहे. भारतीय संघ या सामन्यात दोन स्पिनर घेवून उतरणार आहे.  कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या दोघांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

भारतीय संघाला मागच्या मालेकेच्या तुलनेत जास्त मेहनत करावी लागणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्राम दिला होता. या मालिकेत त्यांची संघात निवड झाली आहे. त्याचबरोबर भारतीय संघाचे माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी यांचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील चांगल्या कामगिरीमुळे सर्वांच्या नजरा त्यांच्यावर असतील. 
 
 भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायडू,  केदार जाधव, एमएस धोनी, विजय शंकर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल,  भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

न्युझीलंड संघ: केन विलियम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, रॉस टेलर, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टिल, टॉम लाथम, कॉलिन मुनरो, हेनरी निकोल्स, मिचेल सैंटनर, टिम साउदी.