मुंबई : निवृत्तीनंतर आपली गुपितं उलघडायला आशिष नेहराने सुरुवात केलीये, असे म्हणायला हरकत नाही. कारण लाइव्ह मिंट ला दिलेल्या मुलाखतीत त्याने कोणासमोर गोलंदाजी करताना भीती वाटायची, याचा खुलासा केला आहे. नेहराला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज अॅडम गिलक्रीस्टला गोलंदाजी करताना भीती वाटायची. इतकेच नाही तर गिलक्रीस्ट हा दुसऱ्या ग्रहावरील प्राणी वाटत असल्यामुळे त्याच्या समोर गोलंदाजी करताना कशी करावी, हे पटकन समजत नसे. आणि त्याच दबावामध्ये गोलंदाजी करणे कठीण होत असे, असे नेहराने सांगितले.
त्याचदरम्यान त्याने ऑस्ट्रेलियन संघाची तोंडभरून स्तुती केली. निवृत्तीचा निर्णय दबावाखाली न घेता तो माझा स्वतःचा असल्याचे यावेळी नेहरा म्हणाला. आता बुमराह आणि भुवनेश्वर ही जोडी गोलंदाजीची जबाबदारी योग्य पद्धतीने सांभाळेल.
भुवनेश्वर चांगला खेळत असल्याने त्याला खेळायला न देता मी खेळावे, हे मलाच योग्य वाटत नाही. पण हा निर्णय कोणासाठी जागा करायची म्हणून मी घेतला नसून हा माझा स्वतःचा निर्णय आहे. निर्णय घेण्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सोबत मी चर्चा केली होती.
तसेच विराटमध्ये झालेल्या सकारात्मक बदलांचा, त्याच्या वाढलेल्या शारीरिक क्षमतांचे त्याने कौतुक केले.