सामन्यादरम्यान धोनीने पांडेला दिली शिवी...यूझर्सनी दिल्या या प्रतिक्रिया

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात महेंद्रसिंग धोनी पुन्हा जुन्या रुपात पाहायला मिळाला. धोनीने तडाखेबंद अर्धशतकी खेळी साकारताना पुन्हा फॉर्ममध्ये आल्याचे संकेत दिले. 

Updated: Feb 23, 2018, 08:42 AM IST
सामन्यादरम्यान धोनीने पांडेला दिली शिवी...यूझर्सनी दिल्या या प्रतिक्रिया title=

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात महेंद्रसिंग धोनी पुन्हा जुन्या रुपात पाहायला मिळाला. धोनीने तडाखेबंद अर्धशतकी खेळी साकारताना पुन्हा फॉर्ममध्ये आल्याचे संकेत दिले. 

धोनीने २८ चेंडूत ५२ धावांची जबरदस्त खेळी केली. यात ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. या खेळीसोबतच धोनीने सामन्यादरम्यान असे काही केले ज्यामुळे तो अधिक चर्चेत आला.

एरव्ही सामन्यात कूल असणारा धोनी दुसऱ्या सामन्यात मात्र चांगलाच भडकला होता. भारताचा डाव सुरु असताना २०व्या षटकांत धोनी आणि मनीष पांडे फलंदाजी करत होते. या वेळी धोनी स्ट्राईकवर होता. यानंतर धोनीने पांडेच्या दिशेने इशारा केला मात्र पांडेने त्याकडे लक्ष दिले नाही. यानंतर धोनी चांगलाच भडकला आणि मनीष पांडेला शिवी दिली. 

हे सर्व स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झाले. यानंतर धोनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. लोकांनी यावर अनेक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

ट्विटरवर एका युर्जसने म्हटलंय...व्हिडीओत खरंच तुच आहेस का?

 
दरम्यान, धोनीच्या धमाकेदार खेळीनंतरही भारताला दुसऱ्या सामन्यात विजय मिळवता आला नाही. आफ्रिकेने या सामन्यात विजय मिळवत ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.