भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सध्या सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रिय आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर काही दिवसांपूर्वी रोड ट्रिप (Road Trip) दरम्यान टी ब्रेकचा आनंद घेताना दिसला होता. लांबच्या प्रवासात प्रत्येकाप्रमाणेच सचिन तेंडुलकरनेही चहाचा छोटा ब्रेक (Tea Break) घेतला होता. सचिनने इंस्टाग्रामवर याचा व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये तो एका दुकानातून चहा विकत घेताना दिसत होता. त्याच्यासोबत अर्जुन तेंडुलकरही होता. यानंतर सचिन गोव्याच्या किनाऱ्यावर पोहोचला. गोव्यातही सचिनने मजा मस्ती केली आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावरही टाकले आहेत. (accident took place behind Sachin Tendulkar in Goa recorded in camera)
गोव्यातील (Goa) समुद्रकिनाऱ्यावर मस्ती करताना दिसला. याचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. लोकांनी सुरुवातीला या व्हिडीओचा आनंद घेतलाय. पण आता हा व्हिडीओ नीट पाहिला तर एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. सचिन तेंडुलकरने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर फील गुड कॅप्शनसह व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये तो गोव्यातील काही स्थानिक मच्छिमारांशी संवाद साधताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातलेल्या सचिनने त्याचा मासेमारीचा अनुभव अविश्वसनीय असल्याचे म्हटले. बेनौलिम समुद्रकिनाऱ्यावर स्थानिक मच्छिमारांशी बोलताना आणि ते पारंपारिक मासेमारीचे उपकरण रॅम्पन कसे वापरतात हे समजून घेताना दिसला. मात्र सचिनच्या इन्स्टाग्रामवरील व्हिडीओ वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये?
व्हायरल व्हिडिओमध्ये सचिन गोव्याच्या समुद्रात मच्छिमारांशी संवाद साधताना दिसत आहे. या व्हिडीओच्या पहिल्या 2 सेकंदातच धक्कादायक घटना घडली. सचिनच्या मागे समुद्रात स्पीडबोटमध्ये (speedboat) एक माणूस बसलेला दिसत होता. स्पीडबोट सुरू करताच त्याने ती समोर उभ्या असलेल्या माणसावर बोट चढवली. सचिनच्या मागेच ही घटना घडल्याने चांगलीच व्हायरल झाली.
सुरुवातीला अनेकांचे लक्ष्य सुरुवातीला सचिनकडेच होते. मात्र नीट व्हिडिओ पाहून लोकांना हसू आवरले नाही. लोकांनी कमेंटमध्ये याबाबत भाष्य केलं आहे. स्पीडबोटमध्ये बसलेली व्यक्ती नक्कीच हेवी ड्रायव्हर आहे असे एका युजरने कमेंटमध्ये म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने सगळ्यांचं लक्ष सचिनवर आहे पण खरी मजा बॅकग्राउंडमध्ये आहे, असे म्हटले आहे.